जळगाव ते मुंबई विमानसेवा अचानक रद्द होत असल्याने गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:47 IST2018-03-09T22:47:12+5:302018-03-09T22:47:12+5:30
तिकीट काढल्यानंतर हिरमोड

जळगाव ते मुंबई विमानसेवा अचानक रद्द होत असल्याने गैरसोय
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ९ - डिसेंबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवा सुरु झाली. सुरुवातीला आठवड्यातून सहा दिवस असलेली सेवा आता तीनच दिवस आहे. त्यातच विमान अचानक रद्द होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. पालकमंत्र्यांनी लक्ष घालून ही सेवा पुन्हा आठवड्यातून सहा दिवस करावी व विमानाच्या वेळेत बदल करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तिकीट काढल्यानंतर हिरमोड
जळगावातून ही सेवा तीन दिवस असते. त्यानुसार नियोजन करून व्यापारी व इतर मंडळी नियोजन करीत असतात, मात्र तिकीट काढल्यानंतर बºयाचवेळी विमान रद्द होते. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड होतो, असे अनुभवही काही प्रवाशांनी सांगितले.
वेळ सोयीची झाल्यास प्रतिसाद वाढेल
जळगावातून हे विमान दुपारी असल्याने दीड तासानंतर प्रवासी मुंबईत पोहचतो. मात्र त्या वेळी मंत्रालय असो की व्यापाºयांच्या बैठका असे कोणतेही काम शक्य होत नाही. त्यामुळे जळगावसाठीच्या विमानाला मुंबई येथून सकाळचा स्लॉट मिळावा. यामुळे व्यापाºयांचा आणखी प्रतिसाद वाढेल, असा विश्वासही व्यापाºयांनी व्यक्त केला.
आठवड्याच्या सेवेतील एक दिवस तर रविवार असल्याने सुट्टीमुळे कोणतेही कामे होत नाही, असेही काही प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे रविवार ऐवजी दुसºया दिवसाची सेवा सुरू करावी, अशी मागणी आहे. इतकेच नव्हे आठवड्यातून तीन दिवस खूपच कमी होतात, त्यामुळे किमान सहा दिवस तरी ही सेवा सुरू करावी अशी मागणीदेखील होत आहे.
पुणे सेवेचा विस्तार व्हावा
मुंबई पाठोपाठ आता पुण्यासाठीही विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. जळगाव येथून पुणे येथे जाणाºयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे सेवा सुरू झाल्यास त्यास चांगली प्रतिसाद राहील व प्रवाशांचीही सोय होईल असे शहरवासीयांचे म्हणणे आहे.
विमानसेवा सुरू झाल्याने सोय झाली आहे. मात्र ऐनवेळी ते रद्द होऊ नये. तिकीट काढलेले असताना ऐनवेळी विमान रद्द झाल्यास हाल होतात. यात सातत्य असावे. आठवड्यातून किमान पाच दिवस ही सेवा मिळावी.
- पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष, राज्य व्यापारी महासंघ.