खडका रोड मणियार हॉलजवळचा धापा तुटल्याने नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 03:17 PM2018-11-16T15:17:11+5:302018-11-16T15:18:02+5:30

भुसावळ शहरातील खडका रोडवर मनियार हॉलजवळील रस्त्यावरचा धापा मधोमध तुटल्याने यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

Disadvantage of the people due to collapsing near the Rock Road Maniar Hall | खडका रोड मणियार हॉलजवळचा धापा तुटल्याने नागरिकांची गैरसोय

खडका रोड मणियार हॉलजवळचा धापा तुटल्याने नागरिकांची गैरसोय

Next
ठळक मुद्देगल्लीला जोडणारा धापा अनेक दिवसांपासून मधोमध तुटला आहे.३० ते ४० हजारांपेक्षा जास्त नागरिक खडका रस्त्याचा नियमित वापर करतात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर जाम मोहल्ला पुलापर्यंत २४ तास वर्दळ असते.

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील खडका रोडवर मनियार हॉलजवळील रस्त्यावरचा धापा मधोमध तुटल्याने यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
मुस्लीम कब्रस्तानच्या संरक्षण भिंतीला लागून मणियार हॉलजवळ सध्या लग्नसराईची धूम सुरू आहे. या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. या रस्त्यावरील अंतर्गत गल्लीला जोडणारा धापा अनेक दिवसांपासून मधोमध तुटल्याने यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याठिकाणी शाळकरी मुले व नागरिक अनेक वेळा वाहन घेऊन पडली आहेत. तसेच या ठिकाणी नगरपालिकेचा दवाखानासुद्धा आहे.
गटारी तुंबल्या
तसेच या ठिकाणी गटारीमध्येही प्रचंड प्रमाणात घाण साचली असून, त्यामुळे डासांचा संचार होत आहे. आधीच शहरांमध्ये डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजाराची साथ सुरू असून, गटारीची नियमित साफसफाई व्हावी, अशी तक्रारही या भागातल नागरिकांची आहे.
रस्त्याची बिकट परिस्थिती
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर जाम मोहल्ला पुलापर्यंत २४ तास वर्दळ असलेल्या रस्त्याची अत्यंत विदारक परिस्थिती झालेली आहे. पावला-पावलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. याठिकाणी साधी डागडुजीसुद्धा झालेली नाही. याच मार्गाने पुढे खडका गावालासुद्धा प्रवास करावा लागतो. सुमारे ३० ते ४० हजारांपेक्षा जास्त नागरिक या रस्त्याचा नियमित वापर करतात. त्याची डागडुजी होणे अत्यंत गरजेचे आहे.
-संपूर्ण रस्ता ट्रीमिक्स पद्धतीने तयार केला जाणार आहे. तसेच तुटलेल्या धाप्याची पाहणी करून तोही व्यवस्थित केला जाईल.
- रमण भोळे, नगराध्यक्ष, भुसावळ />




 

Web Title: Disadvantage of the people due to collapsing near the Rock Road Maniar Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.