बसचा मार्ग अचानक बदलल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 02:46 PM2019-10-18T14:46:13+5:302019-10-18T14:47:26+5:30
पहूर-पाचोरा बसचा मार्ग अचानक बदलल्यामुळे कुºहाड, सांगवी, साजगाव व मोहाडी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
कुºहाड, ता.पाचोरा, जि.जळगाव : अनेक दिवसांपासून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सकाळी पाचोरा येथे जाण्यासाठी असलेली पहूर-पाचोरा बसचा मार्ग अचानक बदलल्यामुळे कुºहाड, सांगवी, साजगाव व मोहाडी येथील शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यातच सध्या प्रथम सत्र परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी या बंद झालेल्या बसमुळे शाळेत वेळेवर पोहोचत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव पास असताना खाजगी वाहनाने महाविद्यालयात जावे लागत आहे.
अनेक दिवसांपासून पहूर येथून सुटणारी बस कुºहाड मार्गे न येता ती १५ दिवसांपासून लोहारा येथून शेंदुर्णी मार्गे वळवण्यात आली. यामुळे या परिसरातील शेकडो विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे.
तरी ही बस कुºहाड मार्गे पूर्ववत सुरू करण्याची मागणी परिसरातील विद्यार्थी व प्रवाशांकडून मागणी होत आहे.
सध्या आगारात बसेसची संख्या कमी असल्याने लोहारा, कळमसरा येथील विद्यार्थ्यांसाठी ही बस शेंदुर्णी मार्गे वळवण्यात आली होती, तरी कुºहाड परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही बस शनिवारपासून पूर्ववत सुरू करण्यात येईल.
-मनोज तिवारी, आगार व्यवस्थापक, पाचोरा