जिल्हा उपनिबंधकांनी मागविला माध्यमिक पतपेढीकडून खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:18 AM2021-09-27T04:18:35+5:302021-09-27T04:18:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढी यातील लिपिक रवींद्र मोरे यांच्या निलंबनावरून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढी यातील लिपिक रवींद्र मोरे यांच्या निलंबनावरून तसेच मोरे यांनी केलेल्या विविध तक्रारींवरून जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी संस्थेकडे पाच दिवसांच्या आत पुराव्यांसह मुद्देनिहाय खुलासा मागविला आहे. पाच दिवसांत खुलासा सादर न केल्यास परिणामांची जबाबदारी आपली राहील, असा इशाराही यात देण्यात आला आहे.
संस्थेच्या कामकाजाबाबत, गैरव्यवहाराबाबत तसेच संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा न घेणे, यासह रवींद्र मोरे यांना निलंबित केल्याने त्यांना न्याय मिळण्याबाबत मोरे यांनी गंभीर स्वरूपाचे आक्षेप नोंदविलेले असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी नोटिसीत म्हटले आहे. त्या अनुषंगाने तक्रार अर्जांनुसार नमूद बाबींना अनुसरून अर्जनिहाय व मुद्देनिहाय खुलासा आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह आवश्यक त्या पुरावादर्शक कागदपत्रांसह कार्यालयात सादर करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. याच्या प्रती तक्रारदार रवींद्र मोरे, पोलीस अधीक्षकांना माहितीसाठी देण्यात आलेल्या आहेत.