परीक्षा शुल्कात सवलत द्यावी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:17 AM2021-05-11T04:17:27+5:302021-05-11T04:17:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मोठ्या प्रमाणात आकारले जात आहे. कोरोना महामारीची परिस्थिती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : व्यावसायिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मोठ्या प्रमाणात आकारले जात आहे. कोरोना महामारीची परिस्थिती पाहता विद्यापीठाने परीक्षा शुल्क कमी करावे व परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्रभारी कुलगुरू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने नुकताच परीक्षेचे वेळापत्रक काढले आहे. परंतु बॅकलॉग व अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षांबाबत स्पष्टीकरण नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत असूनदेखील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मोठ्या प्रमाणात आकारले जात आहे. ते कमी करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
ऑफलाइन पद्धतीचा पर्यायही द्यावा...
विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. पण, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे संगणक, लॅपटॉप, भ्रमणध्वनी, किंवा नेटवर्क सुविधांच्या अभावामुळे परीक्षा देऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांकरिता ऑफलाइन पद्धतीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू राहणार नाही. तसेच डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या परीक्षेचा काही विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाइन संकेतस्थळावर दिसत नसून, काही विद्यार्थ्यांना अनुपस्थितदेखील दाखविण्यात आली आहे, याचीदेखील तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर अभाविपचे प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे, अभाविप महानगरमंत्री आदेश पाटील व संकेत सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.