सनरायजर्सच्या व्यवस्थापनातील मतभेद उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:15 AM2021-04-19T04:15:09+5:302021-04-19T04:15:09+5:30
चेन्नई : सनरायजर्सने मुंबई इंडियन्स विरोधातील हातचा सामना घालवला. अखेरच्या षटकांत एकापाठोपाठ एक गडी बाद होत राहिले. यंदाच्या सत्रात ...
चेन्नई : सनरायजर्सने मुंबई इंडियन्स विरोधातील हातचा सामना घालवला. अखेरच्या षटकांत एकापाठोपाठ एक गडी बाद होत राहिले. यंदाच्या सत्रात हैदराबादने तीनही सामने गमावले आहेत. त्यातच आता सनरायजर्सच्या संघात सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. संघाचे मार्गदर्शक व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि प्रशिक्षक टॉम मुडी यांनी एकाच कारणासाठी दोन वेगवेगळी स्पष्टीकरणे दिली आहेत.
संघात टी. नटराजन याचा समावेश अंतिम अकरा खेळाडूंमध्ये करण्यात आला नव्हता. मात्र त्यासाठी लक्ष्मण यांनी त्याला दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्याला सुज आलेली असल्याने तो खेळू शकला नसल्याचे लक्ष्मण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र मुडी यांनी सांगितले की टी. नटराजन हा संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला या सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. वर्क लोड मॅनेजमेंटच्या कारणाने तो या सामन्यात खेळला नाही.’
संघ व्यवस्थापनातील दोन प्रमुख व्यक्तींनी दोन वेगवेगळी विधाने केल्याने संघात नक्कीच सारेकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.