विवेकशील सामंजस्य
By admin | Published: May 8, 2017 02:27 PM2017-05-08T14:27:19+5:302017-05-08T14:27:19+5:30
‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशल या सदरात पत्र या विषयावर जयंत पाटील यांनी केलेले लिखाण
Next
प्रिय केतू, सप्रेम आठवण
मागील महिन्यात तू जळगावी इकडच्या घरी दोन वेळा येऊन गेलीस. तू नीरजबरोबर आलीस तेव्हा थंडीने चांगलीच काकडली होतीस. घरात कोळसे होते, शेगडीही होती. पण तुङया आगमन आनंदात शेगडीचे विस्मरण झाले खरे!
माझी आई चुलीवर स्वयंपाक करायची. चुलीतल्या प्रकाशाने तिचा तांबूस झालेला चेहरा आणि कार्यमगA हात आठवतात; आणि गलबलायला होते..मी खरं तर तिचा टीकाकार; पण तिचे कौतुकपारडेही चांगलेच वजनदार आहे. दुपारचा सारा स्वयंपाक आवरला, की ती पांढ:या मातीने चूल पोतारायची. नंतर हळद-कुंकू रांगोळीची चार बोटे रेखली जायची. चूल एक स्त्रीरूपच धारण करायची.
तू जळगावी दोन्हीवेळा इतकी मोकळी आणि निर्भर वाटलीस, की तू कॉलेजात अध्यापक आहेस हेच आम्ही विसरून गेलो होतो. तू अगदी रसज्ञतेने रस घेऊन तुङया कल्पनेप्रमाणे बाजूबंद घडवून घेतलास. त्या दुकानातील मॅनेजर-सेल्समन यांनीदेखील तुङया निवडीला दाद दिली.
दागिने किंवा बाजूबंद घेताना तो जास्त वजनाचा तर होत नाही ना, म्हणून आईला, ‘आई, वजन जास्त होतेय काय? थोडे कमी करायचे?’ असे सारखे विचारीत होतीस.
ही तुझी सहजकृती चांगलीच स्मरणात राहिली आहे केतू. आई म्हणते, ‘मला नसले तरी चालेल, माङया सुनेला काही कमी पडायला नको.’
या वेळेचा आमचा पुणे मुक्काम चांगलाच लांबला. अर्थात खरेदीही महत्त्वाचीच होती. तू आणि नीरजने स्वागत सोहळ्यासाठी मला सूट शिवायला लावून अगदी नवरदेवच करून टाकले की ! तुम्ही दोघे, नीरज आणि तू ज्या आवेगाने हात हाती घेता, बोटांनी खेळता तेव्हा या काळातले हे आविष्कार आम्हाला फार फार सुखावह वाटतात. आमच्या काळात नव-वधूवरांना बोलायचे असले तरी जिन्याखालचा अंधार किंवा घरातलीच निर्धोक जागा लागायची. बायकोसोबत चालणेदेखील दुरापास्त होते. हरिवंशराय बच्चनसारख्या कवीला म्हणूनच म्हणावे लागले, ‘वेद लोकाचार प्रहरी ताकते हर चाल मेरी / बद्ध इस वातावरण में. क्या करे अभिलाश यौवन.’
रात्री तुम्ही दोघे आम्हाला रिक्षानी ट्रॅव्हलवर सोडायला येत होता. तू-मी-आई आपण रिक्षात होतो. वाटेत अचानक तुझा मोबाइल वाजला. तू जवळजवळ 10 मिनिटे त्या फोनवर बोलत होतीस. तो फोन विद्याथ्र्याचा होता. त्याने विचारलेल्या शंकांचे तू निरसन करीत होतीस.
फोन झाल्यावर म्हणालीस, ‘उद्यापासून त्यांची परीक्षा आहे.’ एखाद्याने माझी माणसे माङयासोबत आहेत. ही काय फोन करायची वेळ आहे? असे म्हणून टाळले असते. पण तुङया विवेकशील सामंजस्याने आम्ही सुखावून गेलो.
केतू. खूप खूप प्रेम.
तुङो- आई-बाबा.