बाह्य रुग्ण कक्ष बंद करण्याची चर्चा दुर्देवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 09:07 PM2021-03-01T21:07:47+5:302021-03-01T21:07:47+5:30
नाना महाजन : उपस्थित न राहणा-या कर्मचा-यांवर कारवाई करा
जळगाव : जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत जि.प.मुख्यालयात सुरु करण्यात आलेले बाह्य रुग्ण कक्ष बंद करण्यावर चर्चा करण्यात आली. भाजपचे जि.प.सदस्य अमित देशमुख यांनी तीन कर्मचाऱ्यांची बाह्य रुग्ण कक्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली असताना प्रत्यक्षात कक्षात एकच कर्मचारी उपस्थित राहत असल्याने हे बाह्य रुग्ण कक्ष बंद करण्याची मागणी केली होती. यावर समितीच्या बैठकीत बाह्य रुग्ण कक्ष बंद करण्यावर चर्चा झाली. दरम्यान शिवसेनेचे जि.प.सदस्य नाना महाजन यांनी बाह्य रुग्ण कक्ष बंद करण्याची चर्चा दुर्दैवी असल्याचे आरोप केला आहे.
दरम्यान, नियुक्त केलेले कर्मचारी उपस्थित राहत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, मात्र हे बाह्य रुग्ण कक्ष बंद करू नये अशी मागणीही त्यांनी केली. कर्मचारी उपस्थित राहत नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकारी समितीला आहे. मात्र समिती नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता ओपीडी बंद करण्यास का हतबल आहे? असा सवालही नाना
महाजन यांनी उपस्थित केला आहे.
डॉक्टर दाखवा हजार रुपये मिळवा
ओपीडीसाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.अभिषेक ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ते याठिकाणी हजर नसतात, त्यांच्याकडून अतिरिक्त काम होत नसेल तर त्यांनी ती जबाबदारी
दुसऱ्याकडे द्यावी असे सांगत वैद्यकीय अधिकारी दाखवा आणि हजार रुपये मिळावा असे आव्हान नाना महाजन यांनी दिले आहे. 'माझ्याकडे फैजपूर आरोग्य केंद्राचा अतिरिक्त कार्यभार असल्याने आपण काही दिवस तिकडे तर काही दिवस जिल्हा परिषदेतील बाह्य रुग्ण विभागात कार्यरत असतो, त्यामुळे ओपीडीत डॉक्टर नसल्याचा मुद्दा हा गैरसमजाने मांडला गेला असावा, असे स्पष्टीकरण वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक ठाकूर यांनी दिले आहे.