वरणगाव निवडणुकीबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 10:04 PM2020-03-05T22:04:03+5:302020-03-05T22:04:09+5:30

आढावा : महाविकास आघाडीबाबत विचार

Discussion in Congress meeting on Varanga elections | वरणगाव निवडणुकीबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा

वरणगाव निवडणुकीबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा

Next


भुसावळ : वरणगाव नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने बैठकीचे आयोजन केले होते. तर भुसावळ येथेही बुथ प्रमुखांच्या नेमणुका व शाखांचे पुनर्गठन करणे या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
बुधवार रोजी भुसावळ व वरणगांव येथील शासकीय विश्रामग्रूह येथे या बैठकी पार पडल्या. वरणगाव येथील बैठकीत नगर पालिकेच्या निवडणूक संदर्भात काँग्रेसच्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदिप पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डी.के. पाटील, उत्तर महाराष्ट्र काँग्रेसचे समन्वयक योगेंद्र पाटील, अनु . जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष अशपाक काझी, जिल्हा काँग्रेसचे सुरेश पाटील, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे काझी, राजा देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, जयंत सुरपाटणे, राजू पालमकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
दरम्यान लवकरच वरणगाव नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणते वॉर्ड सुरक्षित आहे व कोणत्या वॉडार्तून निवडणुका लढवायच्या यासंदर्भात चर्चा करण्यात आली. निवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेनेसोबत महाआघाडी करायची का ? आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
भुसावळ येथे
बुथ पुनर्गठन संदर्भात चर्चा
भुसावळ शहर काँग्रेस कमिटीची बैठक शहर निरिक्षक चौधरी यांचे अध्यक्षतेखाली झाली. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रविंद्र निकम यांनी बुथ कमिटिचे पुनर्गठन करणे व शाखा स्थापन करणे बाबत मार्गदर्शन केले.
मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सुनिल जोहरे, सलिम शेख, कलिम बेग, संतोष साळवे, विलास खरात, महेंद्र महाले, विनोद पवार, विकास विराट, अमर खंडेराव, प्रदिप नेहते, सरचिटणीस शैलेश अहिरे, राजू डोगरदिवे, जिल्हा महिला सचिव राणी खरात, रेखा सोनवण यास्मिनबी आदी उपस्थित होते.

Web Title: Discussion in Congress meeting on Varanga elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.