ओबीसी मेळावा घेण्यावर एरंडोल येथे बैठकीत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:42+5:302021-07-16T04:13:42+5:30
एरंडोल : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक झाली. त्यात एरंडोल येथे ओ.बी.सी. मेळावा घेण्याबाबत चर्चा झाली. ...
एरंडोल : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक झाली. त्यात एरंडोल येथे ओ.बी.सी. मेळावा घेण्याबाबत चर्चा झाली.
महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मंत्री छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओ.बी.सीं.चे राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी आरक्षण पे चर्चा ह्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी गुरुवारी एरंडोल येथे समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक अनिल नळे, उत्तर महाराष्ट्र निरीक्षक नितीन शेलार, जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, राजू महाजन, भूषण माळी यांनी भेट देऊन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्राथमिक चर्चा केली.
यावेळी विविध ओ.बी.सी. संघटनांचे अध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष अरुण महाजन, गोपाल श्यामू पाटील, रामभाऊ गांगुर्डे, डॉ.अतुल सोनवणे, नगरसेवक योगेश महाजन, संदीप पाटील, संघरत्न गायकवाड, माजी नगरसेवक संजय महाजन, गजानन महाजन, गोपाल यादव महाजन, शहराध्यक्ष सागर महाजन, प्रमोद महाजन, कमलेश महाजन, नीलेश महाजन, रवींद्र महाजन उपस्थित होते.
एरंडोल येथे ओ.बी.सी. मेळावा घेण्याबाबत चर्चा झाली. मेळाव्याविषयी लवकर दिनांक व वेळ निश्चित करून कळविण्यात येईल, असे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे.