विद्यार्थांच्या परिक्षांबाबत बोर्डाच्या सचिवांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:14 AM2021-01-18T04:14:59+5:302021-01-18T04:14:59+5:30

इकरा विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात जळगाव : इकरा उर्दू विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ...

Discussion with the Secretary of the Board regarding the examinations of the students | विद्यार्थांच्या परिक्षांबाबत बोर्डाच्या सचिवांशी चर्चा

विद्यार्थांच्या परिक्षांबाबत बोर्डाच्या सचिवांशी चर्चा

Next

इकरा विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात

जळगाव : इकरा उर्दू विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कवी-लेखक डॉ.मिलिंद बागुल यांनी मराठी भाषा आणि बोली भाषा यांच्या वाहक असणाऱ्या साहित्याने सामाजिक , सांस्कृतिक जाणं प्रगल्भ करीत विचारधारा जोडण्याचे काम केले असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. अब्दुल करीम सालार ,मुख्याध्यापक डॉ. शेख हरून बशीर, शालेय समिती सभापती प्रा. एस. एम. जाफर आदी शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन जाकीर हुसेन यांनी तर आभार जावेद शेख असलम यांनी मानले.

रेल्वेतही ज्येष्ठांना सवलत देण्याची मागणी

जळगाव : एसटी महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत देण्यात येत असतांना, रेल्वेत मात्र कुठलीही सवलत देण्यात येत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनानेही रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र साबळे यांनी केले आहे.

सुपरफास्ट गाड्यांना जादा डबे जोडण्याची मागणी

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी राहत असून, यामुळे शेवटच्या जनरल डब्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यामुळे अनेक प्र‌वाशांना उभे राहुन प्र‌वास करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने सुपरफास्ट गाड्यांना जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधुन होत आहे.

वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी

जळगाव : टॉवर चौकात सिंग्रल यंत्रणा नेहमी बंद असल्यामुळे वाहने सुसाट धावत आहे. यामुळे अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी वाहतूक विभागाने टॉवर चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुक कोंडी

जळगाव : नवीन बस स्थानकासमोर नेहमी दुचाकी व चारचाकी वाहने उभी राहत असल्यामु‌ळे, रस्त्यावरील वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी या ठिकाणी दररोज वाहतुक कोंडी उद्भवत असून, नागरिकांना रस्ता ओलांडणेही अवघड झाले आहे.

पथदिवे लावण्याची मागणी

जळगाव : मु. जे. महाविद्यालयाच्या परिसरात रात्री अनेक ठिकाणी पथदिवे राहत असल्यामुळे, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे चोरीच्या घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी मनपाने या भागात पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.

Web Title: Discussion with the Secretary of the Board regarding the examinations of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.