भुसावळ येथे लोडशेडिंग निषेधार्थ शिवसेनेची दिवे लावून चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:01 AM2018-10-11T01:01:33+5:302018-10-11T01:02:27+5:30
बुधवारपासून नवरात्रोत्सव सुरू झाला. त्यापूर्वीच भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमण दातूनवाले यांना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्यासमोर तेलाचे दिवे लावण्यात आले. भारनियमन सुरू असताना महागाईच्या काळात साध्या तेलाचे दिवे लावणेसुद्धा परवडत नाही, असे शहरप्रमुख बबलू बºहाटे यांनी अतिरिक्त अभियंत्यांना सांगितले.
भुसावळ, जि.जळगाव : ऐन नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, ईद व इतर सनासुदीच्या तोंडावर भुसावळ विभागातील ४७ फिडरवर भारनियमन सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारपासून नवरात्रोत्सव सुरू झाला. त्यापूर्वीच भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमण दातूनवाले यांना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्यासमोर तेलाचे दिवे लावण्यात आले. भारनियमन सुरू असताना महागाईच्या काळात साध्या तेलाचे दिवे लावणेसुद्धा परवडत नाही, असे शहरप्रमुख बबलू बºहाटे यांनी अतिरिक्त अभियंत्यांना सांगितले.
याप्रसंगी तालुका प्रमुख समाधान महाजन, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, शहरप्रमुख दक्षिण विभाग बबलू बºहाटे, शहर प्रमुख उत्तर विभाग नीलेश महाजन, महिला आघाडी जिल्हा संघटिका पूनम बºहाटे, महिला आघाडी शहर संघटिका भुराबाई चव्हाण, शहर संघटक योगेश बागुल, उपशहर प्रमुख अन्सार शाह, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, उपशहर संघटक नबी पटेल, उपशहर संघटक सोनी ठाकूर, भारतीय विद्यार्थी सेना शहर प्रमुख हेमंत बºहाटे, माजी शहरप्रमुख नामदेव बºहाटे, नितीन पाटील, शरद जोहरे, आसिफ पटेल, फिरोज तडवी, शेख रिझवान, मोहसीन तडवी, शकील शेख, शेखर तडवी, विक्की चव्हाण, निखिल बºहाटे, चेतन वाघ, जावेद जाफर, दीपक जाधव, रितेश राणे, सनी जोहरे, हर्षल पाटील, राहुल सावकारे, रवी केतवाझ, रोहित नागदेव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.