जळगाव जिल्हाघिकाऱ्यांच्या बदलीची पुन्हा चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:27 PM2020-06-14T12:27:12+5:302020-06-14T12:27:57+5:30
जळगाव : कोरोनाच्या उपाययोजनांसदर्भात वेगवेगळे आरोप होऊन जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचा दावा सध्या केला जात आहे. ...
जळगाव : कोरोनाच्या उपाययोजनांसदर्भात वेगवेगळे आरोप होऊन जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असल्याचा दावा सध्या केला जात आहे. यामध्ये शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली झाल्याची पुन्हा चर्चा रंगली. विशेष म्हणजे त्यांच्या जागेवर येणाºया अधिकाºयांचे नावही जाहीर होऊन त्यांच्या छायाचित्रासह अभिनंदनाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले. या बदलीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी इन्कार केला असून आपल्यापर्यंत असे आदेश आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या बदलीची या पूर्वी अनेक वेळा चर्चा रंगली आहे. दोन-तीन महिन्यातून अशी चर्चा होत असल्याचे वारंवार समोर आले. त्यात आता कोरोना बाधित वृद्धेचा मृतदेह आढळून आल्याप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व इतर अधिकारी, कर्मचाºयांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांचीही बदली झाल्याची शनिवारी सकाळपासून जोरदार चर्चा सुरू झाली. त्यांच्या जागेवर सांगली जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांची नियुक्ती झाल्याचीही चर्चा रंगून त्यांच्या छायाचित्रासह अभिनंदन होऊ लागले व तसे संदेश व्हायरल झाले.
मात्र या संदर्भात राऊत यांनाही आदेश मिळालेले नव्हते व इकडे जळगावातही तसे आदेश नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
अद्यापपर्यंत बदलीचे आदेश नाही. सामान्यांच्या हितासाठी आपण काम करीतच राहणार आहे.
- डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी