तरुणाच्या मृत्यूनंतर लसीकरणाची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:43 AM2021-02-20T04:43:13+5:302021-02-20T04:43:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एका खासगी रुग्णालयात फार्मासिस्ट असलेल्या धनेश्वर येवले या तरुणाचा १५ फेब्रुवारीला मृत्यू झाला. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एका खासगी रुग्णालयात फार्मासिस्ट असलेल्या धनेश्वर येवले या तरुणाचा १५ फेब्रुवारीला मृत्यू झाला. या तरुणाने लस घेतल्यानंतर त्याला रिॲक्शन येऊन त्याचा मृत्यू झाल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, या तरुणाने लसच घेतली नव्हती, त्याचे यंत्रणेत नावच नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिले आहे.
महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितल्यानुसार येवले यांना अन्य व्याधी होत्या, यकृताचे आजार होते. मात्र, त्यांनी लस घेतलेल्याची यंत्रणेत नोंद नाही. त्यामुळे लसीकरणामुळे त्यांचा मृत्यू झाला असे म्हणणेच चुकीचे ठरेल, आम्ही स्वत: दोन डोस घेतले असून कोणालाही गंभीर रिॲक्शन नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आयएमए सचिव स्नेहल फेगडे यांच्याशी संपर्क साधला असता अशा चर्चा आहेत, मात्र, त्या चुकीच्या असल्याचे त्यांनी सांगितले. येवले फार्मासिस्ट असलेल्या डॉक्टरांशी संपर्क केला असता येवले हे लसीकरणाला एकटे गेले होते, मात्र, त्यांनी लस घेतली का नाही हे कोणाला माहीत नाही, मात्र, त्यांचे नाव यंत्रणेत नसल्याने त्यांनी लस घेतलेलीच नाही, कारण शासकीय यंत्रणेत सर्व नोंदणी होऊनच लस दिली जात आहे. त्यामुळे या अफवा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.