चर्चा आता शेतावर व्हावी - संपाबाबत नेटिझन्सचा सूर

By admin | Published: June 3, 2017 07:05 PM2017-06-03T19:05:05+5:302017-06-03T19:05:05+5:30

बळीराजाच बळी दिला जात असल्याने संतापाची लाट संप मागे घेतल्यानंतरही कायम

Discussions should now be done on the farm - Netizens surveys about the strike | चर्चा आता शेतावर व्हावी - संपाबाबत नेटिझन्सचा सूर

चर्चा आता शेतावर व्हावी - संपाबाबत नेटिझन्सचा सूर

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3 -  कर्ज असो वा हमीभाव यासाठी जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच बळी दिला जात असल्याने संतापाची लाट  संप मागे घेतल्यानंतरही कायम असून या बाबत सोशल मीडियावर सकाळपासून ‘चर्चा आता वर्षा बंगल्यावर नको, शेतावर व्हावी..’ असे वेगवेगळे संदेश फिरत आहे.
कजर्माफीचा प्रश्न असो वा शेतमालाला हमीभाव मिळण्याचा प्रश्न असो, यासाठी शेतकरी वेठीस धरला जात असल्याने शेतक:यांनी 1 जूनपासून संप पुकारला. या संपाबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश फिरू लागले. अखेर  कोअर कमिटीच्या सदस्यांची सरकारशी चर्चा होऊ हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या नंतरही सोशल मीडियावर वेगवेगळे संदेश फिरू लागले.
मुख्यमंत्री गोड बोलून वेळ मारून नेतात
शेतक:यांशी चर्चा होऊन संप मागे घेतला असला तरी यामध्ये मुख्यमंत्र्यांवर अविश्वास दाखवत ‘मुख्यमंत्री गोड बोलून वेळ मारून नेतात’, असे संदेश पाठविले जात आहे. सोबतच आता आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात शेतक:यांच्या पदरात काय पडेल, हे सांगता ये नाही याची शाश्वती नसल्याचा सूर उमटत आहे.
शेतक:यांनी सावध रहायला हवे
सरकारच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण करीत सरकारने निवडणुकीपूर्वी शेतक:यांबाबत सकारात्मक चित्र निर्माण केले होते. मात्र सत्ता मिळताच सरकारने शब्द फिरविले असल्याने शेतक:यांनी आताही सावध रहायला हवे, असे आवाहन केले जात आहे.
विश्वास ठेवू नका
सरकारने अल्प भूधारक शेतक:यांना कजर्माफीची घोषणा केली असली तरी ती प्रत्यभात मिळेल की नाही याबाबत विश्वास न ठेवण्याचा उल्लेख करीत आता चर्चा बंगल्यावर नको, शेतावर व्हावी, असे आवाहन केले जात आहे.
संपादरम्यान कोअर कमिटीचे सदस्य फुटल्याचा आरोप करीत संपाबाबत संभ्रम असल्याचे, शेतक:यांना संप मागे घेतल्याचा निर्णय अमान्य असेही छोटे, मोठे संदेश व डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची यादी व त्यासाठी लिंकही शेअर केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांची चित्रफित
निवडणुकीपूर्वी भाजपाने काढलेल्या दिंडी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक:यांची बाजू घेत तत्कालीन सरकराला शेतकरी धडा शिकवतील, असे वक्तव्य केले होते. ही चित्रफीतही फिरत आहे.
सरकारचे समर्थन
या अविश्वासाच्या संदेशासह सरकारचे समर्थन करणारेही संदेश फिरत आहे. यामध्ये सरकारने केलेले काम, आताच्या बोलणीमध्ये झालेले मुद्दे मांडले जात आहे.
जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाचे डिजिटलायङोशन
सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता सर्वत्र आपापली माहिती शेअर करण्यासाठी याचा पुरेपूर वापर केला जात आहे. यामध्ये जळगाव जिल्हा माहिती कार्यालयानेही याचा स्वीकार करीत आपली माहिती, शासकीय उपक्रम, दररोजच्या बातम्या शेअर करण्यासाठी सोशल मीडियावर लिंक पाठविली जात आहे.

Web Title: Discussions should now be done on the farm - Netizens surveys about the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.