नाराज असलेले माजी मंत्री खडसे भाजपच्या आंदोलनात सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 07:40 PM2020-05-22T19:40:41+5:302020-05-22T19:47:50+5:30

विधान परिषदेची उमेदवारी डावलल्यामुळे नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी भाजच्या आंदोलनात सहभाग नोंदविला.

Disgruntled former minister Khadse joins BJP agitation | नाराज असलेले माजी मंत्री खडसे भाजपच्या आंदोलनात सहभागी

नाराज असलेले माजी मंत्री खडसे भाजपच्या आंदोलनात सहभागी

Next
ठळक मुद्देराग पक्षावर माझा नाही जनता माझ्या पाठीशी व मी पक्षासोबतच !

लोकमत न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर , जि.जळगाव : ठाकरे सरकार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अपयशी ठरल्यावरून महाराष्ट्रात ‘मेरा अांगण, मेरा रणांगण’ असे अभिनव आंदोलन करत महाराष्ट्र बचाव'चा नारा देणाºया भाजच्या आंदोलनात पक्षाबाबत नाराज असलेले माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी स्वत: स्नुषा व खासदार रक्षा खडसे यांच्यासमवेत आंदोलनात सहभाग नोंदवला. एवढेच नव्हे तर भाजपचे तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील व व सरचिटणीस संदीपराव देशमुख यांनी आघाडी शासनाविरोधात दिलेल्या घोषणांना प्रतिसाददेखील देऊन आपण पक्षाबरोबर असल्याचे एकप्रकारे दाखवून दिले. माझा राग पक्षावर कधीही नाही, पक्ष वाढवण्यासाठी मी ३९ वर्षे राजकीय संघर्ष करत महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षाची जी ध्येयधोरणे असतील ते राबवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असतो व राहू. जनता आपल्या पाठीशी आहे. -एकनाथराव खडसे, माजी मंत्री, महाराष्ट्र

Web Title: Disgruntled former minister Khadse joins BJP agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.