रुग्ण कमी झाल्याने जीएमसीत निर्जंतुकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:18 AM2021-05-25T04:18:06+5:302021-05-25T04:18:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची संख्या घटत असल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची संख्या घटत असल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सोमवारी विविध वाॅर्डात व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच निर्जंतुकीकरणदेखील करण्यात आले.
राज्य शासनाने कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. यामुळे जिल्हाभरामध्ये कोरोना महामारी आता कमी झाली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही सोमवार, २४ मार्च रोजी सुमारे १८० खाटा रिक्त झाल्या आहेत. एस. एम. एस. संस्थेचे सफाई व कंत्राटी कामगार, चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि सफाई कामगार यांनी रुग्णालयातील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
निर्जंतुकीकरण आणि साफसफाई करताना एस. एम. एस. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे निरीक्षक अजय जाधव, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी मंगेश बोरसे, सफाई कामगारांचे प्रतिनिधी जितेंद्र करोसिया यांनी कर्मचाऱ्यांना सूचना करून स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला. या अभियानासाठी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, आदींचे मार्गदर्शन लाभले.