बसस्थानकात मनपातर्फे निर्जंतुकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:17 AM2021-03-16T04:17:22+5:302021-03-16T04:17:22+5:30
जळगाव : नवीन बसस्थानकात सोमवारी मनपातर्फे सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले. बसस्थानकाची इमारत, आसने, चौकशी केंद्र, आरक्षण केंद्र यासह ...
जळगाव : नवीन बसस्थानकात सोमवारी मनपातर्फे सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले. बसस्थानकाची इमारत, आसने, चौकशी केंद्र, आरक्षण केंद्र यासह प्रशासकीय इमारतीत सॅनिटाईजरची फवारणी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपातर्फे करण्यात आलेल्या निर्जंतुकीकरणामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविकांना विमा लागू करण्याची मागणी
जळगाव : गेल्या वर्षी जिल्ह्यातील दोन अंगणवाडी सेविकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, अद्यापही शासनातर्फे पन्नास लाखांचा विमा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाने अंगणवाडी सेविकांना कोरोना योद्धा विमाकवच लागू करून, या सेविकांना आर्थिक मदत देण्याची मागणी ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉग्रेसतर्फे राज्य उपाध्यक्ष अमृत महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
किसान मालगाडीद्वारे फुलांचीही वाहतूक
जळगाव : रेल्वेतर्फे गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या किसान रेल्वे मालगाडीद्वारे आतापर्यंत मध्य रेल्वेच्या विविध स्टेशनवरून आतापर्यंत एकूण ६२, २५२ फुलांची वाहतूक केली आहे. दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्येही ही फुले विक्री
करण्यात आली. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळाले असल्याचे भुसावळ रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
टन फुलांची वाहतूक केली आहे.