स्नेहसंमेलनाचा वाद उफाळला

By admin | Published: February 17, 2017 12:30 AM2017-02-17T00:30:21+5:302017-02-17T00:30:21+5:30

यावल : दोन विद्याथ्र्याना मारहाण, नऊ जणांवर गुन्हा दाखल

The dispute arising out of affection | स्नेहसंमेलनाचा वाद उफाळला

स्नेहसंमेलनाचा वाद उफाळला

Next

यावल : गेल्या आठवडय़ात शहरातील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलनात गाणे सादर करण्यावरून  झालेला वाद गुरुवारी पुन्हा उफाळून आला. जमावाने दोन विद्याथ्र्याना जबर  मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले.
दरम्यान, नऊ संशयितांविरुद्ध दंगलीच्या गुन्ह्यासह अनधिकृतपणे घरात प्रवेश करणे, मारहाण करणे शिवाय जमावबंदी कायद्याचे  उल्लंघन केल्याच्या आरोपावरून दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात       आला.
गेल्या आठवडय़ात साने गुरुजी    माध्यमिक  विद्यालयात स्नेहसंमेलनातील गाण्यावरून वाद झाला होता. विद्याथ्र्यासह 20 जणांविरुद्ध  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यातील सहा संशयितांना   अटक करण्यात आली. ते पोलीस कोठडीत आहेत.
   पुन्हा वाद उफाळला 
   बारावीचा विद्यार्थी विशाल कोल्हे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास माझा मित्र कुंदन शशिकांत बडगुजर हा पॅनकार्ड काढण्यासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गेला असताना त्यास संशयित आरोपी चेतन गजरे, आनंद सुरवाडे, आकाश पारधे यांनी स्नेहसंमेलनातील गाण्यावरून आमच्या मुलांना का मारले असा प्रश्न करीत मारहाण केली.
यानंतर कुंदन व त्याची आई हा प्रकार सांगण्यासाठी माङया घरी  आली व रडत कुंदनच्या आईने झालेली घटना माङया आईस सांगितली.   पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली.
माझी आई कुंदनच्या आईसोबत पोलीस ठाण्यात जात असल्याचे पाहून   आरोपी हितेश गजरे, विलास भास्कर, युवराज सोनवणे, युवराज भास्कर,  चेतन गजरे, आनंद बि:हाडे, आकाश सुरवाडे, विशाल गजरे, स्वपAील पारधे व अन्य चार अनोळखी इसमांनी  माङया घरात प्रवेश करून मला  घराबाहेर काढत स्नेहसंमेलनात आमच्या पोरांना मारण्यात तू सहभागी होता तरीसुद्धा तुझी आई कुंदन बडगुजरसोबत पोलीस ठाण्यात  आमच्याविरुद्ध तक्रार देण्यास गेली  असे म्हणत संशयितांनी मारहाण केली. 
  कोल्हे यांच्या फिर्यादीवरून   नऊ संशयितांसह अन्य 4-5 अनोळखी इसमांविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 149, 452, 325, 324, 323, 504, 506, मुंबई पोलीस कायदा कलम  137 (1), (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक  बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनीता कोळपकर, सहायक फौजदार व्ही. व्ही. धनगर, संजय सपकाळे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The dispute arising out of affection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.