महावीर नगरात घराच्या ताब्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:41 PM2020-01-13T22:41:09+5:302020-01-13T22:41:21+5:30
जळगाव : महावीरनगरातील एका घराच्या ताब्यावरुन दोन कुटुंबांमध्ये वर्षभरापासून वाद सुरू आहे. या प्रकरणात शनिवारी रात्री पुन्हा एकदा ताबा ...
जळगाव : महावीरनगरातील एका घराच्या ताब्यावरुन दोन कुटुंबांमध्ये वर्षभरापासून वाद सुरू आहे. या प्रकरणात शनिवारी रात्री पुन्हा एकदा ताबा घेण्यावरुन वाद झाला. अखेर शनिवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या गटातील अभिषेक सुधीर जैन (वय ३९, रा.महावीरनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनिवारी सांयकाळी ६ वाजता लताबाई राजेंद्र पाटील, मनीलाल गोविंद पाटील, कलाबाई मनीलाल पाटील व सुमीत राजेंद्र पाटील यांच्यासोबत चार अनोळखी लोकांनी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश करुन जैन कुटूंबीयांना मारहाण केली.
जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर गटातील लताबाई राजेंद्र पाटील (४६, रा.महावीरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ६ वाजता अभिषेक जैन, त्याची पत्नी व दोन अनोळखी लोकांनी पाटील यांच्या घरात घुसून बेकायदेशीरपणे ताबा घेतला होता.
जैन यांनी खोटे कागदपत्र तयार केल्याचे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यापूर्वी २७ मार्च २०१९ रोजी देखील अभिषेक व त्याची पत्नी अमृता हे पाटीलयांच्या घरात बेकायदेशीपणे शिरले होते.
त्यावेळी देखील अभिषेक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याला अटक होऊन सध्या तो जामिनावर बाहेर आहे.