कंत्राटदारांमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:12 AM2020-12-09T04:12:56+5:302020-12-09T04:12:56+5:30
रुग्णालयात रंगरंगोटी जळगाव : कोविड रुग्णालय परिसरातील भींती व फलकांवर रंगरंगोटी करण्यात येत असून परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती ...
रुग्णालयात रंगरंगोटी
जळगाव : कोविड रुग्णालय परिसरातील भींती व फलकांवर रंगरंगोटी करण्यात येत असून परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. स्वच्छता निरीक्षक बापू बागलाणे, जितेंद्र करोसीया, राजू सपकाळ, प्रमोद कोळी, प्रेमराज पाटील, उमाकांत विसपुते, रफीक पठाण, ललीत पवार, भूषण पाटील आदींनी याबाबत पुढाकार घेतला आहे.
बायोमॅट्रीक प्रणाली सुरू
जळगाव : जिल्हा परिषदेपाठोपाठ आता सर्व पंचायत समित्यांमध्येही बायोमॅट्रीक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी कमी झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, ग्रामपंचायत स्तरावरही ही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे.
निधीचे नियोजन
जळगाव : जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याचे सांगत कामे खोळंबली असून कधी निधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यासाठी नियोजन करण्यात येत आहे. मध्यंतरी अधिकाऱ्यांनी नियोजन न केल्याने पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. आता हळू हळू नियोजन केले जात आहे.
६० रुग्ण दाखल
जळगाव : कोविड रुग्णालयात ६० कोरोना रुग्ण दाखल आहेत. अनेक दिवसांपासून ही संख्या शंभराच्या खालीच आहे. मध्यंतरी हा आकडा ४५ वर पोहोचला होता. तर काही दिवसांपूर्वी ८५ रुग्ण दाखल होते. रुग्णालयात मृतांची संख्याही घटली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
यावलला दिलासा
जळगाव : यावल तालुक्यात सक्रीय रुग्णांची संख्या ३ वर आली आहे. मंगळवारी ३ रुग्णांना कोरोनामुक्तीनंतर घरी सोडण्यात आले. तर एक नवा रुग्ण आढळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांमध्ये घट झाल्याने सक्रीय रुग्णांची संख्या घटली आहे.
६२ रुग्ण क्वारंटाईन
जळगाव : जिल्ह्यातील क्वारंटाईन कक्षामध्येही ६२ जणांना दाखल करण्यात आले आहे. स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येईपर्यंत या रुग्णांना या ठिाकणी रहावे लागते. मध्यंतरी क्वांरंटाईन कक्षांमध्ये मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर अॅन्टीजन चाचण्यांना सुरूवात झाली.