नगराध्यक्षासह एका नगरसेविकेस अपात्र करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 10:49 PM2018-09-03T22:49:01+5:302018-09-03T22:49:25+5:30

यावल येथील दोन जणांची जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका

Disqualify a corporation with a municipality | नगराध्यक्षासह एका नगरसेविकेस अपात्र करा

नगराध्यक्षासह एका नगरसेविकेस अपात्र करा

googlenewsNext

यावल, जि.जळगाव : पालिकेची निवडणूक होऊन सहा महिन्यांच्या आत जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याच्या कारणावरून येथील नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांना नगराध्यक्ष पदावरुन अपात्र करणारी याचिका माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी, तर नगरसेविका कल्पना वाणी यांनी मुदतीच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याच्या कारणावरुन गिरीश प्रकाश महाजन या नागरिकाने जिल्हाधिकाºयांकडे त्यांना अपात्र करण्याबाबत याचिका दाखल केली आहे.
येथील पालिकेच्या नोव्हेबर २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षा सुरेखा कोळी या अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिला राखीव जागेवर लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत.
मात्र अद्यापपर्यंत कोळी यांनी जात पडताळणीचे वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचा उल्लेख पाटील यांनी ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाºयांकडे सादर केलेल्या याचिकेत केला आहे. याचिकेत म्हटले आहे की, २७ नोव्हेबर रोजी सुरेखा कोळी या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या आहेत. निवडून आल्यानंतर त्यानी आजपावेतो अनुसूचित जमाती प्रवर्गाचे वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.
निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज सादर करताना त्यांनी सहा महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची हमी दिली होती. निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास माझी निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल आणि नगरपंचायत सदस्य राहण्यास निरर्ह/अपात्र ठरेल याची मला जाणीव आहे, असे हमीपत्र दिले होते. परंतु त्यांनी अद्यापपर्यंत वैधता प्रमाणपत्र सादर न केले नाही. त्यामुळे त्यांना अपात्र करावे, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे, तर येथील महाजन गल्लीतील रहिवासी तथा मतदार गिरीश प्रकाश महाजन यांनी प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका कल्पना दिलीप वाणी या ना.मा.प्र. वर्गातील महिला आरक्षण जागेवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. मात्र त्यांनी दिलेल्या मुदतीत नामाप्र वर्गाचे वेैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही म्हणून त्यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, नगरसेविका कल्पना वाणी यांच्या म्हणण्यानुसार, २९ मे २०१७ ला वैधता प्रमाणपत्र सादर केले असल्याचे सांगितले. २६ मे २०१७ रोजी वैधता प्रमाणपत्र मिळाले. २७ मे २०१७ रोजी चौथ्या शनिवारमुळे, तर २८ मे रोजी रविवारी कार्यालयास सुटी आल्याने २९ मे रोजी वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचे सांगितले. मुदतीच्या अखेरच्या दिवशी शासकीय सुटी असल्याने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी ते सादर करण्यात आले.

Web Title: Disqualify a corporation with a municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.