अमळनेर तालुक्यातील 15 गावांचा वीज पुरवठा 18 तास खंडीत
By Admin | Published: May 2, 2017 05:27 PM2017-05-02T17:27:24+5:302017-05-02T17:27:24+5:30
मंगरुळ येथील 132 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर ड्रीप झाल्याने 1 रोजी रात्री साडेआठ वाजेपासून तब्बल 15 गावांचा वीज पुरवठा 18 तास खंडित झाल.
अमळनेर,दि.2 - तालुक्यातील मंगरुळ येथील 132 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर ड्रीप झाल्याने 1 रोजी रात्री साडेआठ वाजेपासून तब्बल 15 गावांचा वीज पुरवठा 18 तास खंडित झाल्याने ग्रामस्थांचे भर उन्हाळ्यात हाल झाले. तर मंगरूळ येथील एमआयडीसी मधील यंत्रे थंडावली होती.
1 रोजी 132 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर ड्रीप झाल्याने एकूण सात फिडरवरील 11 केव्हीच्या लाईन बंद पडली. त्यामुळे मंगरूळ, शिरुड, फापोरे, सडावण, कन्हेरे, सुंदरपट्टी, बिलखेडे, बहादरवाडी, खोकरपाट, कावपिंप्री, इंदापिंप्री, ढेकू, हेडावे, सारबेटे, एकरूखी आदी गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल झाले. तर विद्युत मोटारीने पाणी भरणा:यांना पाणी मिळू शकले नाही. मंगरूळ येथील एमआयडीसीचाही पुरवठा खंडीत झाल्याने कारखाने बंद होते.
मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेनंतर विद्युत पुरवठा सुरू करण्यात आल्याचे अमळनेर ग्रामीण कक्षाचे सहाय्यक अभियंता अंकुश सरोदे यांनी सांगितले.(वार्ताहर)