जि. प. दायित्व, विकासकामांसाठी २६५ कोटी निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 AM2021-05-29T04:14:11+5:302021-05-29T04:14:11+5:30

जळगाव : जिल्ह्यात ग्रामिण भागातील विकास कामांसाठी व मागील दायीत्व असे २६५ कोटी निधी देण्यात यावा,अशी मागणी शुक्रवारी जिल्हा ...

Dist. W. Demand for Rs 265 crore for liability and development works | जि. प. दायित्व, विकासकामांसाठी २६५ कोटी निधीची मागणी

जि. प. दायित्व, विकासकामांसाठी २६५ कोटी निधीची मागणी

Next

जळगाव : जिल्ह्यात ग्रामिण भागातील विकास कामांसाठी व मागील दायीत्व असे २६५ कोटी निधी देण्यात यावा,अशी मागणी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील व उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. निधी देण्याबाबत पालकमंत्र्यांनी कामांचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या तसेच चर्चेवेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी नियोजनबाबातची कार्यवाही करण्याचे सांगितले.

सदस्य नानाभाऊ महाजन उपस्थित होते. माजी जि.प सदस्य आर.जी.पाटील यांनी सन २०२०-२१ तसेच सन २०२१-२२ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी संदर्भरत मागील दायीत्व तसेच २०२१-२२ साठी जि.प प्रशासनास २६५ कोटीच्या निधी आवश्यकता असल्याचे लेखाशिर्ष निहाय निवेदन देवून चर्चा केली.

असा मागितला निधी

जनसुविधा १०० कोटी, सिंचन ६५ कोटी ३०५४ या हेडअंतर्गत ४९ कोटी, ५०५४ या हेडअंतर्गत ४८कोटी,नागरीसुविधा ४ कोटी, यात्रास्थळ ७ कोटी, नवीन शाळा खोल्या, २० कोटी, दुरूस्ती १६ कोटी, आरोग्य उपकेंद्र दुरूस्ती ३ कोटी, उपकेंद्र बांधकाम १५ कोटी, प्राथमिक आरोग्य केंद्र २६ कोटी, अशा हेड निहाय निधीची मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी पालकमंत्र्यांकडे केली आहे.

Web Title: Dist. W. Demand for Rs 265 crore for liability and development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.