जि. प. त गणित फिस्कटले ग्रा.पं.तही एकत्रीकरण विस्कटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:37 AM2021-01-13T04:37:50+5:302021-01-13T04:37:50+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे एकत्र येऊत सत्ता पालट करणाऱ्या महाविकास आघाडीचे गणित जिल्हा परिषदेत अगदी ...

Dist. W. Maths fizzled out G.P. | जि. प. त गणित फिस्कटले ग्रा.पं.तही एकत्रीकरण विस्कटले

जि. प. त गणित फिस्कटले ग्रा.पं.तही एकत्रीकरण विस्कटले

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : विधानसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे एकत्र येऊत सत्ता पालट करणाऱ्या महाविकास आघाडीचे गणित जिल्हा परिषदेत अगदी जवळ जावून फिस्कटले होते आणि ग्रामपंचायत निवडणुकीतही स्थानिक राजकारण वेगळे असल्याचे सांगत या तीनही पक्षांनी स्वतंत्र भूमिका मांडली आहे.

जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्रीत लढत असल्याचे शिवसेना जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी सांगितले, मात्र, या निवडणुकांमध्ये पक्ष दूर ठेवूनच निवडणुका लढल्या जातात. पक्षांपेक्षा व्यक्तींना या ठिकाणी महत्त्व दिले जाते, असे एकत्रीत चित्र आहे. कुठल्याही ठिकाणी आम्ही एकत्र लढतोय असा ठोस दावा तिन्ही पक्षांनी केलेला नाही. या निवडणुकांच्या आधीही अशी कुठलीच भूमिका पक्षांनी मांडली नव्हती. आगामी काळात सहकारी संस्था, जिल्हा परिषद, नगरपिरषदा यानिवडणुका असल्याने या निवडणुकांमध्ये फटका नको म्हणून पक्ष आणि विविध पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीत स्पष्ट सावध भूमिका घेतल्याचे चित्र आहे. आम्ही निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्या होऊ शकल्या नाही, असे सांगत जसे सुरू आहे तसे सुरू राहू द्या, आगामी काळात आपल्याला धक्का नको, असे जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांची भूमिका असल्याचे चित्र आहे. अनेकांनी यात कुठलाच रस न घेता. जो जिंकला तो आपला...अशा भूमिकेतून निवडणुकांपासून लांब राहणे पसंत केले आहे. या निवडणुकीत लक्षवेधी ठरली ती नशिराबादची ग्रामपंचायत माघारीसाठी विरोधकही सोबत आले. थोडक्यात हा निर्णय बाजूला राहिला. ९२ गावांनी पक्षीय राजकारण दूर सारत बिनविरोधचा आदर्श ठेवला.

निकालानंतर चित्र बदलले

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षाच्या चिन्ह नाहीत स्वतंत्र उमेदवाराला स्वतंत्र चिन्ह आहे. मात्र, पॅनल विरुद्ध पॅनल असे चित्र आहे. पक्षांना तेवढे या निवडणुकांमध्ये स्थान नसते, त्यामुळे पदाधिकारीही यात अधिक लक्ष न घालता या निवडणुकांपासून दूर राहण्याची भूमिका स्वीकारतात. निकालानंतर मात्र, पक्षांकडून अधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा होऊ शकतो, तेव्हा चित्र बदलू शकते.

हाही आमचाच तोही आमचाच

जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यापैकी ९२ बिनविरोध झाल्या तर नशिराबादच्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबत संभ्रम आहे. ६९० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे.

n पक्षाचे पदाधिकाऱ्यांची भूमिका आता स्पष्ट दिसत नाही. मात्र, हाही आमचा तोही आमचा सद्या अशा भूमिकेत पक्ष दिसत, कोणीही जिंकला तरी त्याच्यावर दावा आपलाच अशी पक्षांची भूमिका असल्याचे चित्र आहे.

कोट

काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वतंत्र आहे, काही ठिकाणी महाविकास आघाडी आहे. मात्र, सर्वदूर हे राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचेच पारडे जड आहे. आताही एकत्र आहोत. निकालानंतरही आम्ही एकत्रीतच राहू. गावांच्या विकासासाठी आम्ही एकत्रीत राहणार आहोत.

- ॲड. रवींद्र पाटील जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

स्थानिक राजकारण नेहमी वेगळे असते, त्या ठिकाणी पक्षाचे चिन्ह नसते. तरीही ज्या ठिकाणी शक्य होईल तिथे सोबत अन्यथा स्वतंत्र लढा अशा सूचना डिसेंबरमध्ये बैठकीत आम्ही तालुकाअध्यक्षांना दिल्या होत्या. पक्षाचे प्रभारी प्रकश मुगदीया यांनीही तेच सांगितले होते. मात्र, शेवटी स्थानिक चित्र वेगवेगळी असतात ॲड. सदीप पाटील,

जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

जिल्ह्यात काही ठिकाणी महाविकास आघाडी आहे. त्यात अमळनेरात ८० टक्के ग्रामपंचायती आम्ही सोबत आहोत. कुठे कमी कुठे अधिक असे चित्र आहे. चाळीसगाव तालुक्यातही तसेच चित्र आहे. निकालानंतरही स्थानिक पातळीवरील चित्र बघून सोबत राहण्याचा निर्णय होईल. कुठे कमी कुठे अधिक अशी स्थिती आहे. - गुलाबराव वाघ

जिल्हाध्यक्ष, शिवसेना

Web Title: Dist. W. Maths fizzled out G.P.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.