तापी खोऱ्यात हिंगोणे गावात दारूभट्टी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:55+5:302021-07-04T04:12:55+5:30

अमळनेर : तापी नदीच्या खोऱ्यात हिंगोणे सीम गावाला मारवड पोलिसांनी छापा टाकून २२ हजार रुपयांची गावठी दारू, कच्चे ...

The distillery in Hingone village in Tapi valley collapsed | तापी खोऱ्यात हिंगोणे गावात दारूभट्टी उद्ध्वस्त

तापी खोऱ्यात हिंगोणे गावात दारूभट्टी उद्ध्वस्त

Next

अमळनेर : तापी नदीच्या खोऱ्यात हिंगोणे सीम गावाला मारवड पोलिसांनी छापा टाकून २२ हजार रुपयांची गावठी दारू, कच्चे रसायन नष्ट करून भट्टी उद्ध्वस्त केली आहे. आरोपी फरार झाला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला, हेडकॉन्स्टेबल फिरोज बागवान, संजय पाटील, सुनील तेली यांनी हिंगोणे सीम गावी तापी नदीच्या खोऱ्यात काटेरी झुडपात गजानन कोळी यांच्या शेताच्या बाजूला छापा टाकला असता त्याठिकाणी भरत श्रावण कोळी हातभट्टीवर गावठी दारू गाळत होता. पोलिसांना पाहताच तो पळून गेला. त्याठिकाणी ४ हजार ७०० रुपयांची गावठी दारू, रसायन, पत्री ड्रम, बाडगी, तगारी तर १८ हजार रुपये किमतीचे ३ प्लास्टिकचे ड्रम भरलेले गूळमिश्रित रसायन, असे एकूण २२ हजार ७०० रुपयांचा माल नष्ट करून भट्टी उद्ध्वस्त केली.

दारूचे व रसायनाचे नमुने घेऊन मारवड पोलीस स्टेशनला भारत कोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The distillery in Hingone village in Tapi valley collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.