विकासामधील मतभेदांचा खोडा झाला दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:52 AM2017-12-16T11:52:28+5:302017-12-16T11:55:53+5:30
जि. प. अध्यक्षांनी घडवला समन्वय: 40 कोटींची विविध कामे लागणार मार्गी
ठळक मुद्देकामांची यादी देण्यावर एकमतविरोधकांनाही केले सहभागी
ज गाव: जिल्हा परिषदेत सत्ताधा-यांच्या आपसातील मतभेदामुळे गेल्या 9 महिन्यात कामांचे नियोजनच न झाल्याने 40 कोटींचा निधी तसाच पडून असल्याची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी 15 रोजी दुपारी खास बैठक बोलावून सर्वामध्ये समन्वय घडवून आणला. यामुळे आता अनेक कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा नियोजन कडून जिल्हा परिषदेला आलेला 20 कोटींचा निधी आणि रस्त्यांच्या कामासाठीचा 20 कोटींचा असा एकूण 40 कोटींचा निधी तब्बल 9 महिने उलटले तरी खर्ची पडला नाही. वादामुळे जिल्ह्यातील विकास कामांना खिळ बसत असल्याचे पाहून शुक्रवारी जि.प अध्यक्षांनी समन्वयाने विकास कामांचे नियोजन करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. त्यांच्या शासकीय निवासस्थानावर झालेल्या या बैठकीत गटनेते तसेच विभाग प्रमुखाची उपस्थिती होती. सदस्यांमध्ये असलेले मतभेद व वाद पहाता अध्यक्षांनी समन्वय घडवून या बैठकीत यश मिळवत 31 मार्चपयर्ंत निधीचे नियोजन करण्याचे ठरविण्यात आले.कामांची यादी देण्यावर एकमतडीपीडीसीकडून जिल्हा परिषदेला यावर्षी 51 कोटीचा निंधी मंजूर झाला आहे. शासन निर्णयानुसार या निधीस 30 टक्के कात्री लागली असल्याने यावर्षी 37 कोटीचा निधी खर्च करता येणार आहे. मात्र त्यात देखील मागील देणी 17 कोटीची असल्याने हाती 20 कोटी निधी राहणार आहे. याचबरोबर यावर्षी शासनाकडून जिल्ह्यातील ग्रामिण रस्ते व जिल्हा मार्ग यासाठी देखील 20 कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या 40 कोटीच्या निधीच्या खर्चासाठी नियोजन करण्यावर पदाधिकारी व गटनेत्यांमध्ये चर्चा बेैठकीत करण्यात येवून 31 डिसेंबर पयर्ंत कामांची यादी देण्याचे सर्वानुमते ठरले.50 लाखांवरील कामांबाबत निर्णय पेंडींग9 ऑक्टोबरच्या शासनाच्या अध्यादेशानुसार 50 लाखावरील कामे सर्वसाधारण सभेत मंजूर करण्याच्या सूचना असल्याने शिवसेना व राष्ट्रवादीने या अध्यादेशानुसारच कामे होतील,तसेच यादी सभेत ठेवावी लागेल अशी भूमिका घेतली तर यास सत्ताधा:यांनी नापसंती व्यक्त केली. मात्र शेवटी कामांची यादी मंजुर करण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्यावर चर्चा करण्यात आली. मात्र काँंग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेने हा निर्णय सभेत घेवू असे सांगितले.दरम्यान प्रशासनाकडून विविध विभागाच्या विकास कामांची यादी तात्काळ दिल्यास ती सभेपुढे ठेवता येईल व त्यामुळे कामाचे नियोजन पदाधिका:यानी तात्काळ करावे, जेणेकरून सभेत मंजुरी घेतल्यानंतर या कामांना प्रशासकीय मान्यता देवून टेंडर प्रक्रिया करता येईल, असेही बैठकीत सांगण्यात आले. विरोधकांनाही केले सहभागीशिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सभागृहात सत्ताधा:यांची नेहमी कोंडी होत असल्याने निधी खर्चात समन्वय साधला जावा यासाठी राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे व शिवसेनेचे नानाभाउ महाजन, कॉंग्रेसचे प्रभाकर सोनवणे यांनाही बैठकीस बोलावण्यात आले होते. यावेळी सभापती पोपट भोळे यांच्यासह अति.मुख्यकारी अधिकारी संजय मस्कर व विभाग प्रमुखांची बैठकीस उपस्थिती होती.