रोजेदारांना फळ वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:16 AM2021-05-10T04:16:15+5:302021-05-10T04:16:15+5:30

लसीकरणासाठी पाठपुरावा जळगाव : पत्रकारांच्या लसीकरणासाठी मागणी केल्यानंतर लसीकरणाला अखेर सुरूवात झाली असून यासाठी आपण पाठपुरावा केला होता, असे ...

Distribute fruit to the fasting people | रोजेदारांना फळ वाटप

रोजेदारांना फळ वाटप

Next

लसीकरणासाठी पाठपुरावा

जळगाव : पत्रकारांच्या लसीकरणासाठी मागणी केल्यानंतर लसीकरणाला अखेर सुरूवात झाली असून यासाठी आपण पाठपुरावा केला होता, असे आमदार सुरेश भोळे यांनी कळविले आहे. यासाठी २९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र दिल्याचे सांगण्यात आले.

सुप्रीम कॉलनीत पाणीपुरवठा

जळगाव : सुप्रीम कॉलनीमधील गजानन महाराज मंदिरामागील गल्ली व परिसरात पाणीपुरवठा खंडीत झाला होता. या विषयी भाजप युवा मोर्चा जिल्हा महानगर सोशल मीडिया प्रमुख भूषण जाधव यांनी मनपा पाणी पुरवठा अभियंत्यांशी चर्चा केली. तसेच आमदार सुरेश भोळे व स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, अमित साळुंखे यांना कळविले. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिली व पाणीपुरवठा सुरळीत झाला.

रस्त्याची दुरुस्ती करा

जळगाव : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे. यामध्ये आर.आर. विद्यालयाकडून भजे गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोदकाम केल्यानंतर त्याची व्यवस्थित दुरुस्ती न झाल्याने वाहनधारकांची कसरत होते. रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

स्वच्छतेची मागणी

जळगाव : जुन्या बस स्थानकात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पसरले आहे. यामुळे या ठिकाणी दुर्गंधी व डासांचाही त्रास वाढला आहे. सध्या बसेस नसल्या तरी या स्थानकाच्या मागे बाजारपेठेत जाणाऱ्या-येणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Distribute fruit to the fasting people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.