कचरा वेचक महिलांना किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:14 AM2021-04-14T04:14:53+5:302021-04-14T04:14:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सुधर्मा संस्थेने शहरातील कचरा वेचक महिलांना किराणा साहित्याचे वाटप केले आहे. हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सुधर्मा संस्थेने शहरातील कचरा वेचक महिलांना किराणा साहित्याचे वाटप केले आहे. हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी सुधर्माने शहरातील दहा कचरा वेचक महिलांना किराणा सामानाचे वाटप केले. तसेच या महिलांना साडीदेखील देण्यात आली. सकाळी दहा वाजता गुढीपाडव्याच्या दिवशी काव्यरत्नावली चौकात त्यांना ही मदत देण्यात आली. यावेळी हेमंत बेलसरे, सुनीता बेलसरे व नितीन तायडे उपस्थित होते.
कचरा उचला
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जाकीर हुसेन कॉलनी परिसरातील मोकळ्या प्लॉटमध्ये कचरा साठला आहे. हा कचरा मनपाच्या आरोग्य विभागाने लवकरात लवकर उचलून न्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
मोहाडी रस्त्यावरील खड्डे बुजवा
जळगाव : मोहाडी रस्त्यावर लांडोरखोरी समोर सुमारे २०० मीटरच्या अंतरात रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे साहित्या नगर, महिला रुग्णालय या परिसरात जाणाऱ्या नागरिक त्रस्त झाले आहेत. हे खड्डे बुजवण्याची आणि रस्ता डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.