अडचणीतील शेतक:यांना मदत द्या!

By admin | Published: January 19, 2016 12:50 AM2016-01-19T00:50:54+5:302016-01-19T00:50:54+5:30

धुळे : राज्याचे परिवहनमंत्री आणि आमदारांच्या पथकाने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची महिनाभरापूर्वी भेट घेतली़

Distributed Farmers: Help! | अडचणीतील शेतक:यांना मदत द्या!

अडचणीतील शेतक:यांना मदत द्या!

Next

धुळे : राज्याचे परिवहनमंत्री आणि आमदारांच्या पथकाने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची महिनाभरापूर्वी भेट घेतली़ समस्यांचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला आह़े तो अहवाल गोपनीय असला तरी त्यात मांडण्यात आलेले प्रश्न सोडविण्याच्या सूचना संबंधित अधिका:यांना देण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितल़े

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने धुळे जिल्ह्याचा दुष्काळी दौरा शिवसेनेच्या पथकाने पूर्ण केला़ या दौ:यात राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, आमदार राजन साळवी, आमदार सुरेश गोरे, आमदार सदानंद चव्हाण, आमदार चाबुकस्वार यांचा समावेश होता़ यासह माजी आमदार प्रा़शरद पाटील, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, राजेंद्र पाटील, शहरप्रमुख सतीश महाले, माजी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे, संजय गुजराथी, डॉ़माधुरी बाफना, हेमा हेमाडे, वंदना पाटील यांच्यासह अन्य शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. यंदा भीषण दुष्काळाशी सामना करावा लागत आह़े देशातील तीन राज्यात त्याची दाहकता असून त्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश होतो़ आज शेतक:यांना केवळ शेतीसाठी पाणी हव़े तो त्यांचा जीवनमरणाचा प्रश्न बनला आह़े शेतक:यांसह सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहायला हव़े जलयुक्त शिवार अभियानात दरवर्षी पाच हजार याप्रमाणे गावे घेण्याचे धोरण आह़े एक लाख शेततळे तयार करण्याचे नियोजन आह़े त्यामुळे आगामी काळात मागेल त्याला शेततळे देण्याचे धोरण असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आह़े जामफळ धरण किती उपयुक्त आहे, सिंचनाचा प्रश्न कसा मार्गी लागू शकतो, धरणाची उंची वाढविल्यास त्याचा कसा फायदा होऊ शकतो, असे विविध मुद्दे मंत्री रावते यांना सांगण्यात आले. याशिवाय ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली होती़ उद्योगामुळे आमच्या जमिनी हातातून गेल्या, तरुणांना रोजगार उपलब्ध नाही, अशा व्यथा शेतक:यांनी मांडल्या होत्या़ 19 डिसेंबर 2015 रोजी जिल्ह्याचा दौरा आटोपल्यानंतर लागलीच दुस:या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जळगाव जिल्ह्याच्या दौ:यावर असताना मंत्री आणि आमदारांच्या पथकाने तयार केलेला अहवाल त्यांना सादर केला़ हा अहवाल गोपनीय आह़े तरीदेखील त्यात उपस्थित केलेले मुद्दे त्या-त्या मंत्र्यांना, विभागप्रमुखांना सादर केले जाणार आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ त्याचेही नियोजन करण्यात आले आह़े

Web Title: Distributed Farmers: Help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.