जिल्ह्यात ७६ खाजगी रुग्णालयांना ४१० रेमडेसिविरचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:47+5:302021-05-15T04:15:47+5:30

१४ मे रोजी जिल्ह्याला ४१० रेमडेसिविर इंजेक्शनच्या व्हायल्स प्राप्त झाल्या असून त्यानुसार जिल्ह्यातील कोविड उपचार करणा-या ७६ खाजगी रुग्णालयांना ...

Distribution of 410 Remedesivir to 76 private hospitals in the district | जिल्ह्यात ७६ खाजगी रुग्णालयांना ४१० रेमडेसिविरचे वितरण

जिल्ह्यात ७६ खाजगी रुग्णालयांना ४१० रेमडेसिविरचे वितरण

Next

१४ मे रोजी जिल्ह्याला ४१० रेमडेसिविर इंजेक्शनच्या व्हायल्स प्राप्त झाल्या असून त्यानुसार जिल्ह्यातील कोविड उपचार करणा-या ७६ खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटीलेटर बेडच्या संख्येनुसार रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या व्हायल्स या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामीण क्षेत्रातील हॉस्पिटल्सला वितरीत करण्यात आल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा विचारात घेता सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध कार्यालय येथे सप्ताहातील सातही दिवस २४ तास रेमडेसिविर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी व ग्रामीण भागात भरारी पथके प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली असून त्यांच्यामार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांच्याकडील रेमडेसिविरची उपलब्धता व वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यासोबतच महानगरपालिका, नगरपालिका प्रशासन व नगर पंचायतसह औषध प्रशासन विभागाचे आयुक्त यांनी प्राधिकृत केलेल्या आरोग्य अधिकार्‍यांनी नियंत्रण करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होऊ नये याकरीता दररोज प्राप्त झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचे रूग्णालयनिहाय वाटप करण्यात येवून केलेल्या वाटपाची हॉस्पिटलनिहाय रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या संख्येसह व वितरकाच्या नाव व मोबाईल क्रमांकासह यादी तयार करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

Web Title: Distribution of 410 Remedesivir to 76 private hospitals in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.