जळगावात वज्रेश्वरी गणेश मंडळाकडून दररोज ५०० रोपांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 03:26 PM2018-09-17T15:26:47+5:302018-09-17T15:28:48+5:30
शिवाजीनगर भागातील वज्रेश्वरी गणेश मंडळाकडून यंदा पर्यावरणपूरक १६ फुटी गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे़ हीच मूर्ती दरवर्षी मंडळाकडून स्थापित करण्यात येणार आहे़ दरम्यान, रविवारपासून मंडळांच्या सदस्यांकडून दर्शनासाठी येत असलेल्या ५०० भाविकांना रोप वाटप कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली़
जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील वज्रेश्वरी गणेश मंडळाकडून यंदा पर्यावरणपूरक १६ फुटी गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे़ हीच मूर्ती दरवर्षी मंडळाकडून स्थापित करण्यात येणार आहे़ दरम्यान, रविवारपासून मंडळांच्या सदस्यांकडून दर्शनासाठी येत असलेल्या ५०० भाविकांना रोप वाटप कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली़ दररोज ५०० रोपांचे वाटप मंडळातर्फे होणार आहे़
मंडळाचे हे नववे वर्ष आहे़ नेहमीच मंडळाकडून आरास साकारण्यात येत असतात, मात्र यंदा मंडळाकडून पर्यावरण बचावासाठी वृक्षरोप वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे़ विसर्जनापर्यंत मंडळाकडून दर्शनासाठी येणाऱ्या ५ हजार भाविकांना रोपे देण्यात येणार आहे़ या उपक्रमास रविवारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली़
मंडळाचे अध्यक्ष म्हणून दीपक नाझकर, उपाध्यक्ष अजिंक्य डोके, सचिव धनंजय चौधरी, खजिनदार सौरभ जाधव, संस्थापक अध्यध प्रणव नेवे यांच्यासह शेकडो सदस्य जबाबदारी सांभाळतात़ सायंकाळी दर्शनासाठी येणाºया भाविकांना एक-एक रोप देऊन त्यांना जगविण्याबाबत मंडळाकडून आवाहन करण्यात येणार आहे़
मंडपात १६ फुटी फायबरची पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापन करण्यात आली आहे़ या मूर्तीचे मंडळाकडून विसर्जन होणार नसून दरवर्षी याच मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे़ या मूर्तीसोबत शाडू मातीच्या लहान मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे़ त्या मूर्तीचे मंडळाकडून विसर्जन होईल़ दरम्यान, ही फायबरची मूर्ती मेहरूण येथील विनोद पारधी यांनी तयार केली आहे़
गणेशोत्वसानंतर ही फायबरची मूर्ती एमआयडीसी परिसरातील एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार आहे़ ही मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची रविवारी गर्दी झाली होती.