जिल्ह्यात ५१७ रेमडेसिविरचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:16 AM2021-05-12T04:16:23+5:302021-05-12T04:16:23+5:30

जळगाव : कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यातील ८२ खाजगी हॉस्पिटल्सना ५१७ रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आल्याची माहिती ...

Distribution of 517 remedicivir in the district | जिल्ह्यात ५१७ रेमडेसिविरचे वितरण

जिल्ह्यात ५१७ रेमडेसिविरचे वितरण

Next

जळगाव : कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यातील ८२ खाजगी हॉस्पिटल्सना ५१७ रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्ह्याला मंगळवारी ५१७ रेमडेसिविर इंजेक्शनच्या व्हायल्स प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कोविड उपचार करणाऱ्या ८२ खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडच्या संख्येनुसार रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या व्हायल्स वितरीत करण्यात आल्या.

जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा विचारात घेता सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध कार्यालय येथे रेमडेसिवीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी व ग्रामीण भागात भरारी पथके प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली आहे. त्यांचेमार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडेसिविरची उपलब्धता व वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली.

Web Title: Distribution of 517 remedicivir in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.