विभागाकडून ६८ टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण ; ४ लाख २२ हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:46+5:302021-08-12T04:21:46+5:30

सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या ४ लाख २२ हजार ४०३ लाभार्थी विद्यार्थ्यांना ...

Distribution of 68% textbooks by the department; 4 lakh 22 thousand students will get benefits | विभागाकडून ६८ टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण ; ४ लाख २२ हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

विभागाकडून ६८ टक्के पाठ्यपुस्तकांचे वितरण ; ४ लाख २२ हजार विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

Next

सागर दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या ४ लाख २२ हजार ४०३ लाभार्थी विद्यार्थ्यांना लवकरच मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे. नाशिक विभागाकडून पाठ्यपुस्तकांच्या वितरणाला सुरुवात झाली असून ६८ टक्के पाठ्यपुस्तकांचे तालुकास्तरावर वितरण झाले आहे. लवकरच केंद्रस्तरावर वितरणाला सुरूवात होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा संपणार आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, समाजकल्याण अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. यंदा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी जिल्ह्यातील ४ लाख २२ हजार ४०३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप केले जाणार आहे. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जाते. परंतु, सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या तर, पुस्तक छपाईला सुद्धा उशीर झाला. आता शाळा उघडून दीड महिना उलटला, पण, विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके मिळालेली नाही.

२४ लाख ९६ हजार ९१५ प्रतींची मागणी

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने यंदा २४ लाख ९६ हजार ९१५ प्रतींची मागणी नाशिक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार विभागाकडून वितरण प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. १७ लाख ११ हजार ३०९ पाठ्यपुुस्तकांच्या प्रती शिक्षण विभागाला आतापर्यंत प्राप्त झाल्या असून त्या तालुकास्तरावर वितरण करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभागाकडून ६८ टक्के पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

गेल्यावर्षीच्या पुस्तकांचा आधार

पाठ्यपुस्तकच नसल्याने शिक्षक अध्यापन कसे आणि विद्यार्थी ऑनलाइन वर्गात अध्ययन करणार कसे असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान, शासनाने पुढील वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके शाळांना परत करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार गतवर्षीच्या पुस्तकांचा अध्यापन-अध्ययनासाठी आधार शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

पुरवठा प्रतींची संख्या

तालुका - पुरवठा प्रतींची संख्या

अमळनेर - १,५५,०४१

भडगाव - ६०,००३

भुसावळ - १,२४,१९२

बोदवड - ०००००

चाळीसगाव - २,८३,६७३

चोपडा - ७८,७३३

धरणगाव - ६७,३८०

एरंडोल - ७१,७१६

जळगाव - ७५,६७५

जामनेर - २,३२,१२१

मुक्ताईनगर - ६३,८१०

पाचोरा - १,५९,०६७

पारोळा - ७७,०१८

रावेर - १,६०,९८८

यावल - १,०१,८९२

-------

माध्यमनिहाय विद्यार्थी संख्या

मराठी - ३,७१,९७१

उर्दू - ४७,३०८

हिंदी - १,५६२

इंग्रजी - १,५६२

Web Title: Distribution of 68% textbooks by the department; 4 lakh 22 thousand students will get benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.