जळगावात १३६ रुग्णालयांना ७६० रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:15 AM2021-04-25T04:15:50+5:302021-04-25T04:15:50+5:30

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून तुटवडा भासत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचे शनिवारी प्रशासनाच्या नियंत्रणाखालील जिल्ह्यातील १३६ खाजगी रुग्णालयांना ...

Distribution of 760 Remedesivir Injection to 136 Hospitals in Jalgaon | जळगावात १३६ रुग्णालयांना ७६० रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण

जळगावात १३६ रुग्णालयांना ७६० रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण

Next

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून तुटवडा भासत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचे शनिवारी प्रशासनाच्या नियंत्रणाखालील जिल्ह्यातील १३६ खाजगी रुग्णालयांना ७६० रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आले.

जिल्ह्याला २४ एप्रिल रोजी ७६० रेमडेसिविर इंजेक्शनच्या व्हायल्स प्राप्त झाल्या. याचे नियोजन करून जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील कोविड उपचार करणार्‍या ११७ खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन बेडच्या संख्येनुसार ३१५ रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या व्हायल्स या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामीण क्षेत्रातील रुग्णालयांना वितरीत केल्या आहेत. तर १९ कोविड हाॅस्पिटलला ४३६ व्हायल्स कंपनीकडून घाऊक विक्रेत्यांमार्फत परस्पर वितरण होत आहे. तर प्राप्त साठ्यापैकी १० टक्के साठा हा फ्रंटलाईन वर्कर्ससाठी राखीव ठेवण्यात आल्या. या वितरित करण्यात आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या सर्व नोंदी ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी संबंधितांना दिल्या.

Web Title: Distribution of 760 Remedesivir Injection to 136 Hospitals in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.