१२ तालुक्यांमध्ये मदत वाटप आठ दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:15 AM2021-03-06T04:15:28+5:302021-03-06T04:15:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च २०२० या काळात वादळांमुळे झालेल्या नुकसानामुळे मदत दिली ...

Distribution of aid in 12 talukas in eight days | १२ तालुक्यांमध्ये मदत वाटप आठ दिवसात

१२ तालुक्यांमध्ये मदत वाटप आठ दिवसात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च २०२० या काळात वादळांमुळे झालेल्या नुकसानामुळे मदत दिली जात आहे. त्यासाठी ३४ कोटी ५४ लाख रुपयांचे वाटप केले जाणार आहे. त्याच्या याद्या बनवण्याचे काम सद्या जिल्हा प्रशासनाकडे सुरू आहे. पुढील आठ दिवसात ही मदत दिली जाणार आहे. यात एपूण २५ हजार ४८६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यात प्रत्येक शेतकऱ्याला दोन हेक्टरवरील पिकासाठी मदत दिली जाते.

यात बागायत पिकाला १३ हजार ५००, जिरायत पिकाला ६ हजार ८०० रुपये आणि बहुवार्षिक फळपिकाला १८ हजार रुपये मदत शासनाकडून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील यावल, जळगाव, रावेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर, जामनेर, भडगाव, पाचोरा, अमळनेर, चोपडा, धरणगाव आणि पारोळा या तालुक्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे.

Web Title: Distribution of aid in 12 talukas in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.