भुसावळात अधिका:यांच्या तपासणीविनाच दाखल्यांचे वितरण
By admin | Published: June 6, 2017 05:27 PM2017-06-06T17:27:05+5:302017-06-06T17:27:05+5:30
सेतू सुविधा केंद्राची मनमानी : प्रांताधिका:यांनी तहसीलदारांचे टोचले कान
Next
ऑनलाईन लोकमत
भुसावळ, दि.6 : तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या तपासणी व स्वाक्षरीविनाच सेतू सुविधा केंद्रातून जात प्रमाणपत्रासह नॉन क्रिमीलेअर आदी दाखल्यांचे वितरण होत असल्याची बाब प्रांताधिका:यांच्या पाहणीत उघड झाल्याने त्यांनी भुसावळसह बोदवड व मुक्ताईनगर तहसीलदारांसह विभागातील सेतू सुविधा केंद्र चालकांना नोटीस बजावली आह़े
दाखल्यांचे वितरण करताना त्याबाबत रजिस्टरमध्ये नोंद ठेवावी तसेच तपासणीविना दाखल्यांचे वितरण करू नये, असे त्यांनी बजावले आह़े
अधिका:यांनाही बजावली नोटीस
प्रांताधिकारी चिंचकर यांनी तहसीलदार भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगर यांना 5 रोजी नोटीस बजावली आह़े त्यानुसार सेतू तसेच ई सुविधा केंद्रातर्फे दाखल्यांचे वितरण करण्यापूर्वी त्यांची संबंधित लिपिक, नायब तहसीलदार यांनी तपासणी करणे गरजेचे आहे. प्रांत कार्यालयाच्या रजिस्टरमध्ये तशी नोंदणी करण्यासंदर्भात बजावण्यात आले आह़े सेतू सुविधा केंद्रातून परस्पर दाखल्यांचे वितरण होणार नाही, तसेच तत्काळ दाखले मिळण्यासाठी नागरिक प्रांत कार्यालयात तगादा लावत असल्याने हे प्रकार बंद करावेत, असे नोटीसीत बजावण्यात आले आह़े
जादा शुल्क घेतल्यास कारवाई
सेतू तसेच ई सुविधा केंद्र चालकाने विविध दाखल्यांच्या नोंदणीसाठी लागणारे निर्धारीत करून दिलेले विहित शुल्क आकारावे त्यापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास करार रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आह़े