भडगाव तालुक्यात महाराजस्व अभियानांतर्गत दाखल्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 11:14 PM2021-01-29T23:14:38+5:302021-01-29T23:15:13+5:30
भडगाव तालुक्यात महाराजस्व अभियानांतर्गत दाखल्याचे वितरण करण्यात आले.
कजगाव : भडगाव येथील तहसीलदार तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजस्व अभिमान अंतर्गत १ ते २८ जानेवारी या कालावधीत विविध प्रकारचे विक्रमी २९६८ दाखले वितरित करण्यात आले.
तालुक्यात विविध घटकांना या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवर उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांसंदर्भात महसूल विभागाअंतर्गत कार्यालयाशी नियमित संबंध येतो. विद्यार्थी व सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढण्याच्या अनुषंगाने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने राज्यात गेल्या चार वर्षांत सुवर्ण जयंती महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत सरासरी १६०० दाखल्याचे दरमहा वाटप करण्यात येते.