फटाक्यांच्या रकमेतून दहा गरीबांना कपडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 05:27 PM2017-10-07T17:27:06+5:302017-10-07T17:49:22+5:30

क.द.नाईक विद्यालयात फटाके मुक्त दिवाळी अभियान

Distribution of clothes to ten poor people from crackers | फटाक्यांच्या रकमेतून दहा गरीबांना कपडे वाटप

फटाक्यांच्या रकमेतून दहा गरीबांना कपडे वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देक.द.नाईक विद्यालयात फटाके मुक्त दिवाळी अभियान वन्यजीव सप्ताह निमित्त वन्यप्राण्यांचे चित्ररूप प्रदर्शनविद्याथ्र्यानी घेतली फटाके मुक्त दिवाळीची प्रतिज्ञा

ऑनलाईन लोकमत
पाळधी ता. जामनेर (वार्ताहर) -  श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेना सामाजिक वनीकरण व वनविभागामार्फत वन्यजीव सप्ताह घेण्यात आला. यावेळी फटाके मुक्त दिवाळी अभियानाचा संकल्प करण्यात आला. यावेळी जमा झालेल्या रकमेतून 10 गरीब महिलांना कपडे वाटप करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जामनेर लागवड अधिकारी बी.बी.जोमीवाले होते प्रारंभी वन्यजीवांचे चित्ररुप प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हरित सेना शिक्षक डी.एस. पाटील यांनी विविध वर्तमान पत्रातून मिळविलेले 350 वन्यजीवांचे चित्र  लॅमिनेशन करून प्रदर्शनात मांडले होते. विद्यालयातील 750 विद्याथ्र्यानी या प्रदर्शनाचा लाभ घेतला
प्रास्ताविक डी.एस.पाटील यांनी केले. यावेळी वन्य जीवांचे महत्व काय ? व  फटाके मुक्त दिवाळी अभियानात फटाके न फोडता वाचलेल्या पैशांचे शैक्षणिक साहित्य आणा असे आवाहन त्यांनी केले. विद्याथ्र्याना संकल्प पत्र वाटप करण्यात करण्यात आले. विद्यार्थीकडून फटाके मुक्त दिवाळीची प्रतिज्ञा घेण्यात आली. शिक्षकांनी देखील फटाके न फोडण्याचा संकल्प करीत वाचलेल्या पैशाची साडी चोळी आणली व गावातील 10 गरीब महिलांना दिवाळी भेट दिली. कार्यक्रमाला वनविभागाचे एस. एन. पाटील, जीवन पाटील, पिंजारी साहेब, एन. एस. पराडकर, एस, बी, मरसाले, मुख्याध्यापक के.एस.पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. टी. पाटील यांनी तर आभार एस.एस.पाटील यांनी मानले.

Web Title: Distribution of clothes to ten poor people from crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.