यावल तालुक्यातील पिंप्री शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 06:39 PM2019-01-27T18:39:42+5:302019-01-27T18:40:29+5:30
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे यावल तालुक्यातील पिंप्री येथील प्राथमिक शाळेत ७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे यावल तालुक्यातील पिंप्री येथील प्राथमिक शाळेत ७० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांची चिमुकली शर्वरीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवारी हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून राबवण्यात आलेला हा उपक्रम दिशादायक व पथदर्शी आहे. समाजातील प्रत्येक घटकाने त्यातून बोध घ्यावा, अशी अपेक्षा आमदार जावळे यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हर्षल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अनिल सपकाळे, अरुण सपकाळे, महा-आयटी समन्वयक जितेंद्र कोळी, ज्ञानेश्वर घुले, संदीप रायभोळे, प्रदीप सोनवणे, मुख्याध्यापक योगेश इंगळे, उपशिक्षक सुरेंद्र शेंडे, अमितकुमार पाटील, भूषण झोपे, मोहन कोळी, सतीश भोई, सागर कोळी, विजय तायडे, सतीश तायडे, लक्ष्मण सपकाळे, राहुल सपकाळे, ग्रामसेवक प्रवीण कोळी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अंतर्नादचे अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ जावळे यांचे जनसंपर्क अधिकारी संदीप पाटील यांनी केले.
व्यायामाचे साहित्य देणार
प्राथमिक शाळेसाठी एक वर्गखोली बांधून मिळावी, असे साकडे ग्रामस्थांनी आमदार जावळे यांना घातले. व्यायामशाळेसाठी साहित्य देणार असल्याची ग्वाही आमदार जावळे यांनी दिली.