पाचोरा येथे कोळी समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:57 PM2019-07-17T18:57:25+5:302019-07-17T18:58:05+5:30
अॅड.कविता रायसाकडा यांनी कोळी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
पाचोरा, जि.जळगाव : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने अॅड.कविता रायसाकडा यांनी कोळी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
उत्तम प्रतीचे शालेय बॅग, टिफीन बॉक्स, वॉटर बॅग, कंपास पेटी असे साहित्य त्यांनी वाटप केले. यावेळी कविता रायसाकडा यांनी आपल्या मनोगतात दरवर्षी हा उपक्रम वाढिव गरीब होतकरू विद्यार्थीसमवेत असाच राबविला जाईल, असे सांगून विद्यार्थ्यांना वेळ वाया न घालवता स्पर्धा परीक्षासाठी वेळ द्यावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी कोळी महासंघाचे पाचोरा तालुका विधान क्षेत्रप्रमुख पी.के. सोनवणे, अनिकेत सूर्यवंशी, अनिल मासरे, सुनील कोळी राणीचे बांबरुड (युवा कोळी महासंघ ग्रामिण संघटक), राजेंद्र खैरनार, ज्ञानेश्वर बोरसे, प्रवीण बोरसे, बापू मोरे, योगेश बिºहाडे, नाचणखेडा, देवीदास जाधव, सुनील मोरे, लेखराज सोनवणे, दीपक कोळी, प्रमोद सोनवणे, हेमंत विसपुते, अनिल येवले , सचिन पाटिल, शांताराम चौधरी, अबरारभाई मिर्झा आदी उपस्थित होते.