रायपूर येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 03:48 PM2020-04-25T15:48:33+5:302020-04-25T15:49:33+5:30

रायपूर येथे प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्या हस्ते गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Distribution of essential items to the needy at Raipur | रायपूर येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप

रायपूर येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तू वाटप

Next
ठळक मुद्दे ग्रामस्थांनी दिले योगदानमुख्यमंत्री सहायता निधीला दिली मदत

तासखेडा, ता.रावेर, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या रायपूर येथे प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्या हस्ते गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
प्रांताधिकाऱ्यांच्या आवाहनावरून तहसीलदार देवगुणे, गटविकास अधिकारी नाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच कविता पाटील, ग्रामसेवक शरद कोळी, तलाठी मारुळे  व गावकऱ्यांनी गहू, तेल, तुरडाळ, मसूर डाळ, मिठ, तिखट, स्नानाचा साबण, कपडे धुण्याचे साबण, साखर, गूळ, मसूर डाळ अशा १२ प्रकारचे सामानाचे किट वाटप करण्यात आले .
प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर पंडित पाटील यांनी ३१०० रुपयांचा धनादेश प्रांताधिकाºयांकडे मुख्यमंत्री साहायता निधी मदत म्हणून सुपूर्द केला. धान्य वाटपानंतर ग्रा.पं.तीला अधिकाºयांंनी भेट दिली.
ग्रामविस्तार अधिकारी डी.एस.सोनवणे, गहुखेडा विकास सोसायटीचे चेअरमन हेमराज पाटील, सरपंच कविता पाटील, पोलीस पाटील नारायण पाटील, ग्रामसेवक शरद कोळी, मनोज तायडे, तलाठी हेमंत कुमार मारुळे, ज्ञानेश्वर पाटील, युवराज पाटील, सेवानिवृत्त माजी सैनिक पंढरीनाथ पाटील, भाऊलाल चौधरी, यशवंत तायडे, ग्रा.पं.सदस्य प्रवीण तायडे, संदीप पाटील, प्रमोद पाटील, प्रकाश पाटील, सोमनाथ कोळी, विजय पाटील, नीलेश तायडे, जगन्नाथ पाटील, नामदेव पाटील, शालिग्राम चौधरी, सोमा भोई, छगन कोळी, तुकाराम भोई, जिजाबराव पाटील, प्रल्हाद तायडे, ग्रा.पं.सदस्य तुकाराम तायडे, निवृत्ती पाटील, राजू भोई यांनी आर्थिक मदत केली .

Web Title: Distribution of essential items to the needy at Raipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.