आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस शील्ड आणि पीपीई कीट वाटप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 05:09 PM2021-01-14T17:09:02+5:302021-01-14T17:09:26+5:30

आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस शील्ड आणि पीपीई कीट वाटप करण्यात आले.

Distribution of face shields and PPE kits to health workers | आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस शील्ड आणि पीपीई कीट वाटप 

आरोग्य कर्मचाऱ्यांना फेस शील्ड आणि पीपीई कीट वाटप 

Next

भुसावळ : कोरोना लसीकरणाची सुरुवात १६ जानेवारीपासून होणार आहे. असे असले तरी अजून कोरोनाचे उच्चाटन झालेले नाही, आणि फ्रंटलाईन वॉरियर्स असलेले आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यावर लसीकरण देणे आणि ॲक्टिव कोरोना रुग्णांची काळजी घेणे, अशी दुहेरी जबाबदारी आलेली आहे. त्यांनाच सर्वाधिक संरक्षणाची गरज आहे, ही बाब लक्षात घेऊन भुसावळ येथील दंतरोगतज्ज्ञ डॉ.मकरंद चांदवडकर यांनी पालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी तब्बल १२५ फेस शिल्ड आणि पीपीई कीट  यांची भेट दिली. 
याप्रसंगी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तौसिफखान यांना फेस शिल्ड आणि पीपीई कीट डॉ.मकरंद यांनी सुपूर्द केले. 
या प्रतिबंधक साधनांचा उपयोग लसीकरण करताना होईल, असे उद्गार याप्रसंगी डॉ.तौसिफखान यांनी काढले. डॉ.मकरंद चांदवडकर यांच्या कृतीचे परिसरात कौतुक होत आहे.

Web Title: Distribution of face shields and PPE kits to health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.