रोटरी क्लब ऑफ स्टार्सतर्फे रुग्णांच्या नातेवाईकांना फराळाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:20 AM2021-04-30T04:20:07+5:302021-04-30T04:20:07+5:30
जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई आहे. यात ...
जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई आहे. यात सर्वाधिक त्रास हा रुग्णाच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. त्यातच कोविड रुग्णालयात नातेवाईकांना प्रवेश नसल्याने त्यांना दिवसरात्र रस्त्यावर बसून काढावी लागत आहे. या गंभीर परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना मदत व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ स्टारतर्फे तीन दिवस पुरेल इतक्या फराळाचे व पाण्याचे वाटप करण्यात आले.
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ग्रामीण भागातील बहुतांश गरीब रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने नातेवाईक बाहेरच थांबून आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी सुक्या फराळाचे क्लबतर्फे वाटप करण्यात आले. यासोबतच पाण्याच्या बॉटलदेखील देण्यात आल्या. तीन दिवस पुरेल इतका फराळ दिल्याने नातेवाईकांना आधार मिळाला. यावेळी क्लबचे अध्यक्ष धनराज कासट, सागर मुंदडा, करण ललवाणी व पुनीत तलरेजा उपस्थित होते.