बोदवड येथे पोलीस बंदोबस्तात खत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 06:28 PM2020-07-30T18:28:54+5:302020-07-30T18:31:39+5:30
समाधानकारक पावसानंतर खते घेण्यासाठी उडालेली झुंबड आणि होणारे वाद पाहता गुरुवारी पोलीस बंदोबस्तात युरिया खताचे वाटप करण्यात आले.
बोदवड, जि.जळगाव : समाधानकारक पावसानंतर खते घेण्यासाठी उडालेली झुंबड आणि होणारे वाद पाहता गुरुवारी पोलीस बंदोबस्तात युरिया खताचे वाटप करण्यात आले. तालुक्यात सहाशेवर बॅगांचे वितरण झाले.
तालुक्यात युरिया खताचा साठा आला. त्यात बोदवडसाठी ३३५, तर एणगावसाठी २७० अशा ६०५ बॅगांचे वाटप झाले. याआधी बुधवारी रात्रीपर्यंत खताचे वाटप सुरू होते. खते न मिळाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. दरम्यान, गर्दी नियंत्रणात न येणे तसेच वादविवाद होणे यातून मार्ग काढण्यासाठी अखेर गुरुवारी पोलीस बंदोबस्तात खत वाटप झाले. एका व्यक्तीला दोन बॅगा देण्यात येत होत्या.
दोन दिवसांनी पुन्हा युरिया शहरात येणार असल्याचे कृषी अधिकारी धांडे यांनी सांगितले.