बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे फूड पॅकेट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 07:24 PM2020-09-02T19:24:29+5:302020-09-02T19:24:37+5:30

जळगाव : शहरातील विविध भागांमध्ये गणेश मूर्तींचे संकलन करून भक्तीभावाने गणरायाचे विसर्जन करण्यात आले़ त्याच अनुषंगाने बहुभाषिक ब्राह्मण संघाच्यावतीने ...

Distribution of food packets by multilingual Brahmin team | बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे फूड पॅकेट वाटप

बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे फूड पॅकेट वाटप

Next

जळगाव : शहरातील विविध भागांमध्ये गणेश मूर्तींचे संकलन करून भक्तीभावाने गणरायाचे विसर्जन करण्यात आले़ त्याच अनुषंगाने बहुभाषिक ब्राह्मण संघाच्यावतीने शहरातील विविध भागांमध्ये स्वयंसेवकांना तसेच गणेश भक्तांना फूड पॅकेट वाटप केले.
कोरोना महामारीमुळे यंदा अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला़ मंगळवारी अनंत चतुर्थीला बाप्पाला गणेश भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला़ मेहरूण तलावावर नागरिकांना विसर्जनाला बंदी असल्यामुळे शहरातील विविध ठिकाणी गणेश मूर्ती संकलन उभारण्यात आले होते़ याला प्रतिसाद देत नागरिकांनी गणेश मूर्ती संकलन केंद्रांवर दिल्या़ केंद्रांकडून गणरायाचे पूजन करून विसर्जन करण्यात आले़ तसेच बहुभाषिक ब्राह्मण संघाकडूनही शिवाजी नगर, वाल्मिक नगर, पांझरापोळ चौक, का़उक़ोल्हे विद्यालय परिसर, कासार मंगल कार्यालय, ईच्छादेवी चौक, सिंधी कॉलनी, काव्य रत्नावली चौक, पोलीस लाईन शाळा क्र ५, शिरसोली नाका परिसर गुजंन मंगल कार्यालय,गणेश घाट आदी ठिकाणी फूड पॅकेट वाटप करण्यात आले़ यावेळी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अशोक वाघ, उपाध्यक्ष मोहन तिवारी, सचिव पियुष रावळ, राजेश नाईक, गोपाल पंडित, आनंद तिवारी, विश्वनाथ जोशी, शिवप्रसाद शर्मा, श्रीतेज पाठक, कमलाकर फडणीस, दिनकर जेऊरकर, सिध्दांत फडणीस आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमासाठी संस्थेचे माजी अध्यक्ष संजय व्यास, लेखराज उपाध्ये, श्रीकांत खटोड, सुरेंद्र मिश्रा, अजित नांदेडकर, संजय कुळकर्णी, महेंद्र पुरोहित, विशाल शर्मा, किशन अबोटी, प्रकाश शर्मा आदींची सहकार्य लाभले.

 

Web Title: Distribution of food packets by multilingual Brahmin team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.