यावल तालुक्यातील डोंगरदे येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:47 PM2019-06-12T14:47:52+5:302019-06-12T15:05:27+5:30
यावल तालुक्यातील अती दुर्गम भागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरदे येथील आदिवासी पाड्यावरील आश्रय फाऊंडेशन आणि टायगर ग्रुप यांच्यातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले.
डोंगरकठोरा, ता.यावल, जि.जळगाव : यावल तालुक्यातील अती दुर्गम भागात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरदे येथील आदिवासी पाड्यावरील आश्रय फाऊंडेशन आणि टायगर ग्रुप यांच्यातर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले.
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यावर यावल येथील नगरसेवक तथा आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांच्या माध्यमातून डोंगरदे या आदिवासी गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले.
आदिवासी पाड्यावर आणि ग्रामीण भागातील वस्तीवरील गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित न राहता जास्तीत जास्त शिकून शिक्षण घेऊन पुढे जावे याच सामाजिक भावनेतून मदतीचा हात म्हणून आम्ही हा कार्यक्रम राबवित असल्याच फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगितले.
डोंगरदे येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास गावातील आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यशस्वीतेसाठी टायगर ग्रुपचे उज्वल कानडे, रितेश बारी, मनोज बारी, सागर इंगळे, प्रथमेश घोडके, हर्षल कुलकर्णी, भूषण फेगडे, मनोज माळी, केतन चोपडे, भोजराज ढाके आदींनी परिश्रम घेतले.