पाळधी येथे लाभार्थींना वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 12:45 AM2020-10-25T00:45:55+5:302020-10-25T00:49:09+5:30
पाळधी येथे विविध खात्याच्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध दाखल्यांसह मदतीचे वाटप करण्यात आले.
धरणगाव : महाराजस्व अभियान हे सर्वसामान्यांसाठी वरदान असून, पाळधी येथे विविध खात्याच्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध दाखल्यांसह मदतीचे वाटप करण्यात आले.
उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पं.स.सभापती मुकुंद नन्नवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, सरपंच प्रकाश पाटील, चंदू माळी, अनिल कासट, चंदन कळमकर, सचिन पवार आदी उपस्थित होते.
पुरवठा, संजय गांधी, निराधार योजना, कृषी, आरोग्य, विमा लाभ, आधार नोंदणी, सीएससी केंद्र, पंचायत समिती विभाग, रक्तदान शिबिर असे विविध स्टॉल लावण्यात आले होते.
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार योजनेअंतर्गत रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्यात १५५ गटई स्टॉल मंजूर करण्यात आले. तालुक्यात २३ गटई स्टॉल वाटप करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब योजने अंतर्गत तालुक्यातील २८ महिलांना ,वीस हजार रुपयांचे असे ५ लाख ६० हजारांचे धनादेश वाटप करण्यात आले. पंडित दीनदयाल उपाध्याय योजना अंतर्गत तालुक्यातील ४ लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी १ लाख १८ हजार ७४० रुपयांचा धनादेश देण्यात आला. प्रमाणपत्र , रोजगार हमी योजनेअंतर्गत ४७१ जॉब कार्डचे वाटप करण्यात आले. उत्पन्न दाखले , डोमासाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेट, विविध दाखले वाटप करण्यात आले
२४ व्यक्तींनी रक्तदान केले असून त्यांना पालकमंत्री व रेडक्रॉस सोसायटी यांच्यामार्फत विमा संरक्षण प्रमाणपत्र देण्यात आले. वराड बुद्रूक आव्हानी, बोरखेडा, हनुमंतखेडे, पष्टाने , पाळधी, पिंप्री अशा ठिकाणी कोरोना तपासणी कॅम्प घेण्यात येऊन माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम व्यापक प्रमाणात राबवली.
सूत्रसंचालन नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी केले तर आभार तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी मानले.