आर्थिक संकट काळात जामनेरला किराणा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:10+5:302021-07-04T04:12:10+5:30

जामनेर : कोरोना संकट काळात आर्थिक अडचणीच्या वेळी गोरगरिबांना सहाय्यकारी ठरलेल्या कमल मोहन राशन किट योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यात शनिवारी ...

Distribution of groceries to Jamner during financial crisis | आर्थिक संकट काळात जामनेरला किराणा वाटप

आर्थिक संकट काळात जामनेरला किराणा वाटप

Next

जामनेर : कोरोना संकट काळात आर्थिक अडचणीच्या वेळी गोरगरिबांना सहाय्यकारी ठरलेल्या कमल मोहन राशन किट योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यात शनिवारी सकाळी शहरातील सुमारे साडेतीनशे गरजूंना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते विनोद लोढा यांच्या स्व. गेंदाबाई मोहनलाल लोढा प्रतिष्ठानकडून गेल्या अकरा महिन्यांपासून गरीब व गरजूंना या योजनेतून किराणा वाटप केला जात आहे. मुंबई येथील पोतदार मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश ताथेड, शोभा ताथेड, माजी नगरसेवक अनिल बोहरा, जैन श्री संघाचे डॉ. के. एम. जैन, वंदना लोढा व बाळू डांगी यांच्या हस्ते वाटप झाले.

गोपाळ देशपांडे, ॲड. विकास चौधरी, रतन राणा, दीपक देशमुख, जितू पालवे यांनी स्वागत केले. अबूलाला शेख, शरीफ पिंजारी, डॉ. मनोज विसपुते , वसिम शेख उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुधीर साठे यांनी केले, तर आभार विनोद लोढा यांनी मानले. (वा. प्र)

फोटो कॅप्शन 04 एचएसके 01

जामनेर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना डॉ. प्रकाश ताथेडसोबत विनोद लोढा, अनिल बोहरा आदी.

Web Title: Distribution of groceries to Jamner during financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.