आसराबारी पाडा येथे प्रतिकारशक्ती वाढीच्या औषधींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:19 AM2021-09-26T04:19:03+5:302021-09-26T04:19:03+5:30

जळगाव : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त शनिवारी यावल तालुक्यातील आसराबारी पाडा येथे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीच्या विविध औषधींचे वाटप ...

Distribution of immunosuppressive drugs at Asarabari Pada | आसराबारी पाडा येथे प्रतिकारशक्ती वाढीच्या औषधींचे वाटप

आसराबारी पाडा येथे प्रतिकारशक्ती वाढीच्या औषधींचे वाटप

Next

जळगाव : जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त शनिवारी यावल तालुक्यातील आसराबारी पाडा येथे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीच्या विविध औषधींचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमीन पावडर, रक्तवाढीच्या औषधी इत्यादींचा समावेश आहे.

या उपक्रमाला रेडक्रॉसचे मानद सचिव विनोद बियाणी, वैद्यकिय अधिकारी डाॅ. एस.बी.सोनवणे, जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा, सहाय्यक योगेश सपकाळे, अन्वर खान, यावल तालुक्यातील उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राहुल गाजरे उपस्थित होते.

यावल तालुक्यातील आसराबारी पाडा हे ऊसतोड कामगार राहत असलेले ४०० आदिवासी लोकांची लोकवस्ती असलेला पाडा असून याठिकाणी लहान मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे. अशा सर्व बालकांना, गर्भवती महिलांना व गरजूंना या औषधींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पंकज आशिया, डाॅ. प्रमोद पांढरे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, रक्तकेंद्र चेअरमन डाॅ. प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापन समिती चेअरमन सुभाष सांखला यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच यावलचे रेडक्रॉस स्वयंसेवक सारंग बेहेडे, वडरी गावाचे सरपंच भालेराव, राहुल पाटील व सर्व आशा वर्कर्स यांचे सहकार्य मिळाले.

Web Title: Distribution of immunosuppressive drugs at Asarabari Pada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.